HW News Marathi
महाराष्ट्र

मुश्रीफ म्हणाले, मला चंद्रकात पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, आता फडणवीसांचं उत्तर!

मुंबई। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. त्यावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुश्रीफांच्या गौप्यस्फोटावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कुणी ऑफर दिली मुश्रीफांसाहेबांना? असे ऑफर लेटर घेऊन आम्ही फिरत थोडी असतो, असं म्हणत मुश्रीफांचा दावा खोडून काढण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केला.

मी भाजपची ऑफर नाकारली

चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपत येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट मुश्रीफांनी केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्याच्याही पुढे जाऊन मी भाजपची ऑफर नाकारली म्हणून मला त्रास देण्यासाठी माझ्यावर ईडीच्या धाडी वगैरे टाकल्या, असं मुश्रीफ यांनी सांगितलं. या सगळ्या प्रकारावर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी मुश्रीफांवर पलटवार केला आहे.

अशी कोणतीही कुणीही ऑफर दिलेली नाही

हसन मुश्रीफ साहेबांना भाजपमध्ये येण्याची कुणी ऑफर दिली, असा सवाल करताना असे ऑफर लेटर घेऊन आम्ही थोडी फिरत असतो, असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कुणालीही देण्याकरिता, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.मुश्रीफ आता काहीतरी बोलतायत. घोटाळ्याच्या आरोपावरुन लक्ष हटविण्यासाठी त्यांनी आता बाजपची ऑफर होती, असं सांगितलं आहे. त्यांनी अशी कोणतीही कुणीही ऑफर दिलेली नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.

चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सगळं सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ‘कोकण’ बँकेतर्फे 11 लाखांची पे-ऑर्डर

News Desk

राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणाविरोधात खा डॉ प्रीतम मुंडे आक्रमक!

News Desk

वाडिया रुग्णालय आर्थिक संकटात ३००हून अधिक जणांना डिस्चार्ज

News Desk