HW News Marathi
Covid-19

‘ते’ माझे वैयक्तिक मत, उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याचा मला अधिकार नाही !

मुंबई | अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून सध्या देशासह, राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राम मंदिर हा शिवसेनेच्या जिव्हाळाच्या विषय असल्याने शिवसेनेची भूमिका काय असणार ? हा प्रश्न आहे. यातच “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण आहे. मात्र, त्यांनी या सोहळ्याला जाणे टाळावे”, असा सल्ला राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी दिला आहे. मात्र, या सल्ल्यानंतर आता मेमन यांनी घुमजाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे. “माझे ट्विट हे पूर्णपणे माझे वैयक्तिक मत आहे. ती पक्षाची भूमिका नाही. मी पक्षाचा प्रवक्ता नाही वा अन्य कोणत्याही पदावर नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काय करावे ? याबाबत सल्ला देण्याचा मला कोणताही अधिकार नाही”, असे माजिद मेमन यांनी आपल्या नव्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

माजिद मेमन यांनी आपल्या पहिल्या ट्विटबद्दल स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे कि, “माझी ट्विट्स ही माझी वैयक्तिक मते आहेत. ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही. मी पक्षाचा प्रवक्ता नाही. त्याचप्रमाणे, मी पक्षाच्या कोणत्याही अधिकृत पदावर नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत माझा सल्ला मागितला नाही. तसेच उद्धव ठाकरेंनी काय करावे ? याबाबत त्यांना सल्ला देण्याचा मला कोणताही अधिकार नाही.”, दरम्यान, आपल्या पहिल्या ट्विटमध्ये माजिद मेमन असे म्हणाले होते कि, “उद्धव ठाकरे वैयक्तिकरित्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. मात्र, एका धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे प्रमुख या नात्याने त्यांनी कोणत्याही विशिष्ट धार्मिक कार्यक्रमाला चालना देणे टाळावे.”

नेमके काय म्हणाले होते माजिद मेमन ?

“उद्धव ठाकरे यांना अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण पाठविण्यात आले आहे. त्यामुळे, ते वैयक्तिकरित्या या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करून उद्धव ठाकरे पूर्णपणे आपल्या वैयक्तिक क्षमतेत या सोहळ्याला हजेरी लावू शकतात. मात्र, एका धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे प्रमुख या नात्याने त्यांनी कोणत्याही विशिष्ट धार्मिक कार्यक्रमाला चालना देणे टाळावे”, असे माजिद मेमन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या सल्ल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कदाचित मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन १८ मेपर्यंत वाढू शकतो | आरोग्यमंत्री

News Desk

पुणे शहरात ५ ऑगस्टपासून हॉटेल, मॉल सुरू होणार, जाणून घ्या नियम !

News Desk

मुंबईत आज ८,६४६ नवे कोरोना रूग्ण आढळले

News Desk