नवी दिल्ली। मागच्या काही दिसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलं होतं की, भारतात देखील अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते तयार होतील. आणि आता हे वक्तव्य ताज असतांनाच आता ग्रीन हायड्रोजनवर बसेस, ट्रक आणि कार चालवण्याचा प्लॅन असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. शहरातील सांडपाणी आणि घनकचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करता येईल, असं गडकरी म्हणाले. ऑईल रिसर्च इन्स्टिट्यूट, फरिदाबाद यांच्याकडून ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार बनवण्यात आली असून ती विकत घेतली असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. ते नॅशनल समिट ऑन फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी बोलत होते.
सांडपाण्यातून आर्थिक कमाई
गडकरींच्या पुढाकारानं नागपूरमधील 7 वर्षांपासून सुरु असलेल्या प्रकल्पाबद्दल त्यांनी सांगितलं आहे. नागपूरमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. महाराष्ट्र सरकारच्या वीज प्रकल्पाला सांडपाणी विकून नागपूरला 325 कोटी रुपये मिळतात. कोणतीही गोष्ट टाकाऊ नसते. नेतृत्त्वाकडं असणाऱ्या दूरदृष्टीवर सगळं अवलंबून असतं. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तुम्ही कचऱ्यातून आर्थिक कमाई करु शकता, असंही नितीन गडकरी हे या कार्यक्रमानिमित्त म्हणाले आपल्याला वाया जाणाऱ्या पाण्यातून आणि सांडपाण्यातून आर्थिक कमाई करता येते का हे पाहणार आहे. प्रत्येक नगरपालिकेकडे अशा प्रकारचं पाणी उपलब्ध असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.
#WATCH | I have a plan to run buses, trucks, & cars on green hydrogen that would be produced using sewage water & solid waste in cities… I've bought a car that would run on green hydrogen produced in an oil research institute in Faridabad: Union Minister Nitin Gadkari (02.12) pic.twitter.com/qH9yAJN8uN
— ANI (@ANI) December 2, 2021
नवी दिल्लीमध्ये ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार चालवणार असल्याचं म्हटलं. या कार्यक्रमात त्यांनी ग्रीन हायड्रोजनसंदर्भात देखील मार्गदर्शन केलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.