HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंनी काँग्रेस महासचिवांना निलंबित केलं!

नागपूर। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या आक्रमक झालेले दिसत आहेत. पक्षशिस्त मोडल्याच्या कारणास्तव नागपूर जिल्हा काँग्रेस महासचिवांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली. जिल्हा परिषद सदस्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात काँग्रेस पदाधिकारी गज्जू उर्फ उदयसिंग यादव यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

नागपुरात जिल्हापरिषद पोटनिवडीनिवडणुकींचा अर्ज भरण्याचं काम सुरु आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत वाद झाला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाची काँग्रेस कमिटीकडून अंतर्गत चौकशी करण्यात आली होती. पक्षशिस्त मोडून गैरवर्तणूक केल्याचा ठपका गज्जू यादव यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

गज्जू यादव हे नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव होते. मात्र पक्षशिस्त मोडून गैरवर्तन केल्याच्या कारणास्तव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यादव यांचे पक्षातून निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.

काय म्हणाले नाना पटोले?

नाना पटोले यांनी लगेच महासचिवांना निलंबित केलं आहे. नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत गज्जू उर्फ उदयसिंग यादव यांनी पक्षशिस्त मोडून गैरवर्तन केल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि नागपूर प्रभारी चंद्रकांत हंडोरे आणि निवडणूक निरीक्षक रणजीत कांबळे यांनी सादर केल्यावरुन गज्जू यादव यांना पक्षातून निलंबित करण्याचे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का?”, राऊतांचा सवाल

News Desk

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष होणार- संजय राऊत

News Desk

मराठवाड्याच्या हितासाठी धनंजय, पंकजा एकत्र ?

News Desk