HW News Marathi
महाराष्ट्र

“राऊतांच्याच मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरु”, नाना पटोलेंचा उपरोधिक पलटवार

अकोला | शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात कोणत्या ना कोणत्या विषयावरुन शाब्दिक वाद होताना दिसतात. एकाच सरकारमध्ये असूनही हे दोन्ही नेते आपापसांत भिडताना दिसतात. आजच्या (११ जून) सामना अग्रलेखातून राऊतांनी कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांना एख सल्ला दिला आहे. कारण२ दिवसांपूर्वीच कॉंग्रेसचे युवा नेते जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. त्यामुळे आगामी उत्तर प्रदेश निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसला हो मोठा धक्का मानला जातो. यावरुन राऊत यांनी आता राहूल गांधीनी टीम तयार केलीच पाहिजे असा सल्ला दिला होता. त्यावर आता नाना पटोले यांनी राऊतांच्या कानपिचक्या काढल्या आहेत.

नानांच्या संजय राऊतांना कानपिचक्या

दरम्यान, संजय राऊतांना आजच्या सामनातील अग्रलेखांवरून नाना पटोलेंनी त्यांना तिरकस टोला लगावला आहे. संजय राऊतांच्या मार्गदर्शनातच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांच्याकडूनच आम्ही शिकत असतो. तेच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत असतात. संजय राऊतांनी संघटनात्मक बांधणी भाजपकडून शिकण्याच्या सल्ल्यावरही टीका केली आहे. आम्हाला भाजपकडून काहीच शिकण्याची कोणतीच गरज नसल्याचा टोला यावेळी पटोले यांनी राऊतांना लगावला.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे तरुण नेते जितीन प्रसाद यांचा भाजपमधील प्रवेश हा काही मुद्दा असू शकत नाही, पण प्रसाद यांच्या रूपाने काँग्रेसला खिंडार पाडल्याचा उत्सव भाजपने सुरू केला आहे, तो मनोरंजक आहे. अहमद पटेल, राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात त्या पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही. काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन 

News Desk

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा ठराव

Aprna

सहाव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या

News Desk