HW News Marathi
महाराष्ट्र

‘मी ‘सामना’ वाचत नाही, गांधींवर थुंकणं म्हणजे सूर्यावर थुंकणं’, नाना पटोलेंचं बेधकडं विधान

 

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या त्यांच्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता थेट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना डिवचलं आहे. नाना पटोले म्हणाले, “सामनावर मी कोणती ही प्रतिक्रिया देत नाही कारण मी सामना वाचत नाही. कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वारंवार त्याच त्याच गोष्टी सोबत राहून बोललं जातं असेल तर त्याचा विचार आम्हला एकदा करावा लागेल.”

गांधी परिवारावर टीका करण म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं

महाविकासआघाडी पक्षांमध्ये सुरु असलेली कुरघोडी काय आता नवीन नाही. नाना पटोले हे सतत त्यांच्याच पक्षातील नेत्यांवर टीका करत असतात. यावेळेस त्यांनी काँग्रेस वर थुकणाऱ्यांवर बोट ठेवला आहे.आम्हला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. गांधी परिवारावर टीका करण म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. जो थुंकेल त्याच्यावरच पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.

काय होता अग्रलेख?

काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय? असा सवाल करत काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम असल्याचं आजच्या सामना अग्रलेखात शिवसेना नेते खासदार संजय राऊतयांनी म्हटलं आहे. देशभरातील काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाचं डळमळीत झालेलं स्थान, काँग्रेस नेतृत्व यांवर राऊतांनी आजचा अग्रलेख लिहिला आहे.

या अग्रलेखात नेहमीसारखीच रोखठोक मतं मांडण्यात आलेली आहे. काँग्रेस पक्षात सध्या काही उलढाली सुरू आहेत. कार्यकर्त्यांसाठी त्यातून सकारात्मक संदेश जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कमलनाथ यांच्या फेऱ्या सोनियांच्या निवासस्थानी वाढल्या आहेत. कमलनाथ हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष होतील, अशी वावटळ त्यामुळे उठली आहे. खरे काय ते राहुल गांधींनाच माहीत. पंजाबात नवज्योतसिंग सिद्धू यांची प्रदेश अध्यक्षपदी नेमणूक करून पक्ष संघटनेत आता इतर कोणाची दादागिरी चालणार नाही हे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर व नवज्योत यांच्यात बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरू होता. सिद्धू हे काँग्रेस सोडतील अशी हवा होती, पण गांधींनी वेळीच हस्तक्षेप केला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्याला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शनी लागलाय”, व्हिडिओद्वारे रवी राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Aprna

मराठा आरक्षणाच्या लढाईत भाजपात असलेल्या उदयनराजे आणि संभाजीराजेंची शिवसेनेने घेतली बाजू …

News Desk

‘सरकार दाऊदची गँग चालवताय का’? आशिष शेलारांचा सवाल

News Desk