HW News Marathi
महाराष्ट्र

नवनियुक्त महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले १२ फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार

मुंबई | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले व नवनियुक्त कार्याध्यक्ष तसेच उपाध्यक्ष हे शुक्रवार दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वा. ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे.

१९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून अंग्रेजो चलो जावो भारत छोडो हा नारा देत स्वातंत्र्यांच्या निर्णायक लढ्याची सुरुवात केली होती. त्याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. महाराष्ट्र प्रभारी. एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत माजी प्रांताध्यक्ष, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आठ महिने झाले,पाळणा कधी हलणार ? सेनेची राज्यपालांवर टिका!

News Desk

महाराष्ट्रातील ‘या’ गावात चक्क सरपंचपदाचा केला लिलाव…!

News Desk

विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली ?

News Desk