HW News Marathi
महाराष्ट्र

“लावालावी करायचं काम, संजय राऊत त्याचं नाव”; नारायण राणेंनी डिवचलं

मुंबई | राणे कुटुंबीय आणि शिवसेनेतील वाद आता सर्वश्रुत आहे. दोन्ही बाजूंनी संधी मिळेल तशी एकमेकांवर अत्यंत टोकाची आणि जहरी टीका केली जात असते. हे सत्र कधीच संपत नाही. त्यातच आता सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना डिवचलं आहे. “संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे? नेमके राऊतांचे नेते कोण शरद पवार की उद्धव ठाकरे?” असे प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केले आहेत. इतक्यावरच राणे थांबलेले नाहीत. “लावालावी करायचं काम, त्याचं नाव संजय राऊत”, असं म्हणत राणेंनी टोलाही लगावला आहे.

नारायण राणे म्हणाले, “मला कळत नाही कि संजय राऊत नेमके कोणत्या पक्षात आहेत. ते राष्ट्रवादीत आहेत आणि त्यांचे नेते शरद पवार आहेत की ते शिवसेनेत आहेत आणि त्यांचे नेते उद्धव ठाकरे आहेत? काहीच कळत नाही. संजय राऊत हे पक्षाशी प्रामाणिक नाहीत, त्यांची निष्ठा नाही. ते फक्त आव आणायचं काम करत आहेत. लावालावी करायचं काम त्याचं नाव संजय राऊत”, असं म्हणत नारायण राणेंनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर लिहिलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलाताना राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेलाही राणेंनी यावेळी प्रत्युत्तर दिलं.

काही लोकांचे हे व्यवसाय गुपचूप सुरू!

“भाजपला देशाचं ऐक्य नकोय हे शरद पवारांनी २५ वर्षांपूवी सांगितलं होतं आणि आम्हाला हे २ वर्षांपूर्वीच लक्षात आलं. पवार तेव्हापासून सांगत आले आहेत की भाजप देशाचे तुकडे करत आहे, देशाला उलट्या दिशेने नेत आहे. पण आम्हाला ते आता कळायला लागलंय”, असं संजय राऊतांनी म्हटलं. त्यावर नारायण राणे म्हणाले, “भाजपने देशातील ऐक्य बिघडवण्याचं कोणतंही काम केलेलं नाही. पण काही लोकांचे हे व्यवसाय गुपचूप सुरू असतात, हे राजकारण चालू असतं.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ त्या ‘ शेतक-याला ५ लाखाची मदत

News Desk

“आखिर तुम केहना क्या चाहते हो?” निलेश राणेंचा 3 इडियट्सचा डायलॉग म्हणत टोला

News Desk

शरद पवारांच्या ‘त्या’ व्हिडिओवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये ट्विटर युद्ध

Aprna