HW News Marathi
महाराष्ट्र

दालने घेतली पण कारभार हाती कधी घेणार?

मुंबई | सरकार स्थापन करून महिनाभरापेक्षा जास्त काळ लोटला पण अजूनपर्यंत खाते वाटप झालेलं नाही. “मंत्रालयात दालने घेतली व बंगले घेतले परंतु कारभार काही अजून हाती घेतला नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. खातेवाटपा अगोदरच राजीनामा देण्याची सुरूवात झाली आहे. हे सरकार अल्पकालावधीचं असुन ते दोन महिने देखील टिकेल की नाही, याबाबत शंका आहे,” असं माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

महाविकासआघाडीच्या सरकारमधील जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी महाराष्ट्र प्रशासनाचा काहीही अभ्यास केला नाही आणि त्यामुळेच कुठेतरी खातेवाटप ते करु शकले नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते पण कोणतीही तरतूद अद्याप आमलात आणली गेली नाही. त्यामुळे हे फसवणुक करणारं सरकार आहे व अल्पकालावधीचं सरकार असल्याचे नारायण राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.

तीन पक्ष एकत्र येणं हे गणितच चुकलं आहे. या प्रत्येक पक्षाची ध्येय, धोरणं वेगळी आहेत. हे तीनही पक्ष जनतेसाठी नाही तर सत्तेसाठी एकत्र आले आहेत. तसेच, ही शिवसेनेची सत्ता नाही तर राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि मंत्रिमंडळात काँग्रेस व शिवसेनेचं अस्तित्व देखील नाही असंही त्यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिल्लोड-सोयगाव तालुक्याच्या जलसंधारण प्रकल्पांच्या सीमा निश्चितीची  प्रक्रिया पूर्ण करावी! – अब्दुल सत्तार

Aprna

पुण्यातून ‘अल कायदा’शी संबंध असलेले ३ जणांना अटक

News Desk

उद्धव ठाकरेंच्या ‘या’ मागणीला आनंद महिंद्रांनी दर्शवला पाठिंबा

News Desk