HW News Marathi
Covid-19

कोरोनाची लस आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी लोकांसमोर येऊन घ्यावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी

मुंबई | आज (१२ जानेवारी) पुण्याच्या सीरम इन्स्टीट्यूटमधून कोवीशिल्ड लसीच्या वितरणाला सुरुवात झाली. दरम्यान, कोरोना लसीकरणावरुन लोकांमध्ये काही अंशी भीती निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. यावर बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले आहे. “कोरोना लसीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सर्वप्रथन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीव्हीवर लाईव्ह येऊन सर्वांसमोर लस टोचावी”, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

“कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. पण या लसीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळे सर्वप्रथम पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवर लाईव्ह येऊन सर्वांसमोर ही लस टोचून घ्यावी. त्यानंतर मी ती स्वतः घ्यायला तयार आहे. यामुळे लोकांना प्रोत्साहन मिळेल”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल (११जानेवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी कोरोना लसीकरणाच्या मोहीमेविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. तेव्हा मोदींनी येत्या १६ जानेवारीपासून भारतात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले.

पंतप्रधानांनी आधी लस टोचावी, नवाब मलिकांची मागणी

प्रकाश आंबेडकर यांच्या आधी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी लस टोचावी, अशी मागणी केली आहे. ते आज पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. कोरोना लसीच्या सुरक्षिततेविषयी अद्याप काही शंका आहेत. या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सर्वप्रथम लस टोचून घ्यावी, असं ते म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ लसीच्या चाचणीला तात्पुरती स्थगिती

News Desk

उस्मानाबादमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण; जिल्ह्यात भीतीचे वातावरण

News Desk

इतर राज्यांपुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये हीच मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा!

News Desk