नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा निश्चित झाला आहे. ‘क्वाड’ देशांच्या परिषदेत नरेंद्र मोदी सहभागी होणार असून पहिल्यांदाच देशांचे नेते समोरासमोर एकमेकांना भेटणार आहेत. क्वाड देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुढील आठवड्यात या परिषदेचं आयोजन केलं असून केंद्र सरकारने मोदींच्या उपस्थितीला दुजोरा दिला आहे.
“करोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून यावेळी मार्च महिन्यात लसीसंबंधी करण्यात आलेल्या घोषणेसंबंधी यावेळी आढावा घेण्यात येईल,” असंही सांगण्यात आलं आहे. भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्यानंतर याचा फटका बसला होता. याशिवाय बैठकीत तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, हवामान बदल, शिक्षण अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
२४ सप्टेंबरला वॉशिंग्टनमध्ये ही परिषद होणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुमा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन उपस्थित असतील. “या बैठकीत नेते १२ मार्चला झालेल्या पहिल्या व्हर्च्यूअल परिषदेनंतर झालेली प्रगती तसंच सामायिक हिताचे प्रादेशिक मुद्दे यावर चर्चा करतील,” अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.