मुंबई | बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूला आता जवळपास दोन वर्षे होत आली आहेत. तसेच सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान हिचा देखील मृत्यू झालेला. त्यामुळे या दोघांच्या मृत्यूचा एकमेकांशी संबंध असल्याचा दावा अनेकजण करत होते. तसेच या दोघांची हत्या करण्यात आल्याचा आरोपही होत आहे. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करत अनेक दावे केले आहेत.
नितेश राणे यांनी दिशा सालियानच्या मृत्यूचा संबंध निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेशी असल्याचा दावा केला आहे. नितेश राणेंनी केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर त्यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षाच्या प्रतिक्रिया येणं साहजिकच होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, यावेळी मलिक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही
मलिकांनी भाजपच्या नेत्यांचा संबंध थेट अभिनेत्रींशी जोडला आहे. यावर बोलताना मलिक म्हणाले, “भाजपच्या कुठल्या नेत्याचा कुठल्या अभिनेत्रीशी संबंध आहे, याची यादीच आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हाला ते बोलायला लावू नका”, असा इशाराच मलिकांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे. तसंच कोणाचा कुठल्या अभिनेत्रीशी संबंध आहे, हे जर उघड केलं तर भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असंही त्यांनी म्हंटलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.