HW News Marathi
महाराष्ट्र

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी या अभिनेत्रींना NCB ने बजावले समन्स

मुंबई | बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींना चौकशीसाठी बोलावणे पाठवले आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंगला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले आहेत. पुढील ३ दिवसांत चौघींची चौकशी होणार आहे. आज (२४ सप्टेंबर) सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आता बॉलिवडू विश्वातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी समोर येत आहेत.

दरम्यान, सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशी दरम्यान ड्रग्स प्रकरणी २५ जणांची नावे घेतली होती. त्यामध्ये सारा अली खान, रकुल प्रीत सिंगच्या नावाचा उल्लेख केला. एनसीबीतील सूत्रांनुसार, जया साह नावाची महिला रिया चक्रवर्तीला अमली पदार्थ पोहोचवत होती, असं दोघींमधील चॅटमधून समोर आले आहे. या ड्रग्स प्रकरणामध्ये जया साहला एनसीबीनं समन्स बजावले आहे. त्याचप्रमाणे सुशांतची मॅनेजर श्रृती मोदी हिलादेखील समन्स बजावण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कंगना राणावत से दूर रहो”, गृहमंत्र्यांना धमकीचे फोन सुरूच…

News Desk

उस्मानाबाद जिल्ह्यात सव्वा कोटी रुपयांचा‌ 47 पोती गांजा जप्त‌; चौघे‌ तस्कर फरार

News Desk

मुंबईत महानगरपालिकेवर गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेचा परफेक्ट कार्यक्रम सुरुच, राऊतांचा भाजपला टोला

News Desk