HW News Marathi
महाराष्ट्र

नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या नंबरचा पक्ष! – महेश तपासे

मुंबई | नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या नंबरचा पक्ष ठरला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला अशा बाता मारणाऱ्या भाजपला या निवडणुकीत दुसरा नंबरही गाठता आलेला नाही असा जोरदार टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

नगरपंचायत निवडणूकीत विरोधकांनी राष्ट्रवादीला बदनाम करण्याची अनेक षडयंत्र रचली तरीदेखील महाराष्ट्रातील जनतेने नगरपंचायतीत राष्ट्रवादीला कौल दिला आहे असेही महेश तपासे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष – ३०, उपनगराध्यक्ष – ३०, शिवसेना नगराध्यक्ष – २७ उपनगराध्यक्ष – १६, कॉंग्रेस नगराध्यक्ष – २० उपनगराध्यक्ष – २१, भाजप नगराध्यक्ष – २०, उपनगराध्यक्ष – २१ याचा अर्थ एक नंबरचा पक्ष दुसर्‍या नंबर गाठू शकला नाही असेही महेश तपासे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आदित्यजी ‘या’ गोष्टींवर पैसे वाया घालवू नका”

News Desk

“दोन डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार का?” केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषण मागे

swarit