HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची बोलावली बैठक

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१५ मार्च) राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशनानंतर ही पहिली बैठक असणार आहे. महाआघाडी सरकारमधील वादग्रस्त प्रकरणं आणि सरकारची मलिन होत असलेली प्रतिमा या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ही बैठक बोलावली आहे. दोन सत्रात ही बैठक होणार आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून ते मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेपर्यंत या ना त्या मुद्यांमुळे महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावे लागले आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुंबई महत्त्वाची बैठक बोलावली आहेे

सचिन वझे, संजय राठोड, धनंजय मुंडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सेना राष्ट्रवादीमध्ये झालेली रस्सीखेच या सर्व गोष्टींचा आढावा शरद पवार आजच्या बैठकीत घेणार आहेत. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात ही बैठक होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग, MPSC बाबत घेतला मोठा निर्णय

News Desk

ईडी कार्यालयात चौकशीला का जाणार नाही याचे खडसेंकडून स्पष्टीकरण!

News Desk

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश असणार मराठी

News Desk