नवी दिल्ली | मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.
परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये एकट खळबळ माजली आहे. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणावर काय निर्णय घेणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.
The allegations against the Maharashtra Home Minister are serious: NCP Chief Sharad Pawar on former Mumbai Police Commissioner Param Bir Singh's letter to CM pic.twitter.com/3ofawNmDer
— ANI (@ANI) March 21, 2021
काय म्हणाले शरद पवार?
* परमबीरसिंग यांच्या पत्राचे २ भाग आहेत. या पत्रामार्फत गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप
* एका भागात गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप, दुसऱ्या भागात डेलकर प्रकरणावर भाष्य
* ‘त्या’ पत्रावर परमबीरसिंग यांची सही नाही. त्याचप्रमाणे, या पत्रात लिहिले गेले नाही की पैसे कसे दिले गेले.
*परमबीर सिंग यांचे आरोप हे बदलीनंतर, पदावर असताना कुठलेही आरोप नाहीत.
*उत्तम अधिकाऱ्याकडून आरोपांची चौकशी करा, लेटरबॉम्ब प्रकरणी शरद पवारांचा सल्ला
* सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेण्याचा निर्णयही परमबीरसिंग यांचाच होता. तो मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचा निर्णय नाही.
* मी मुख्यमंत्र्यांना सल्ला देईन की, एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याकडून याबाबतची चौकशी व्हावी.
* मुख्यमंत्र्यांकडे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार, सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही.
* सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही
* मविआ सरकार स्थिरच आहे
* चौकशीअंती मुख्यमंत्री निर्णय घेतील, त्यांना निर्णय घेण्याचे सर्व अधिकार
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.