HW News Marathi
महाराष्ट्र

‘भगीरथच’ पंढरपूर – मंगळवेढ्यासाठी भारतनानांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणार !

पंढरपूर | भारतनानांनी पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघासाठी अनेक स्वप्नं पाहिली होती. ती स्वप्न भारतनानांचा भगीरथच पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (३ एप्रिल) कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

“पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात वातावरण सकारात्मक आहे, आघाडीचा विजय निश्चित आहे. भारत नानांनी उभारलेल्या अविरत कार्यामुळे जनता भगीरथ भालके यांना मतरुपी आशीर्वाद देणार हा विश्वास आहे”, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

महात्मा बसवेश्वर महाराज यांचे स्मारक व्हावे ही भारतनानांची मागणी !

“पंढरपूर-मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. जवळपास १२ वर्षाहून अधिक काळ महात्मा बसवेश्वर मंगळवेढ्यात राहिले. त्यामुळे महात्मा बसवेश्वर महाराज यांचे स्मारक व्हावे ही भारतनानांची मागणी होती. लोकांच्या भक्ती भावनांचा आदर करत यावर्षीच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या स्मारकाची तरतूदही केली आहे”, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

बैठका लावून या गावांना २ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला !

भारतनाना माझ्याकडे २४ गावांच्या पाण्याचा प्रश्न घेऊन आले होते. भाजपा सरकारच्या काळात या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र आपले सरकार येताच अधिकाऱ्यांच्या बैठका लावून या गावांना २ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के जलसाठा शिल्लक; ४०१ टँकर्सद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा सुरु

Aprna

“पुण्याच्या महापौरांना झेपत नसेल तर राजीनामा द्या”, सुप्रिया सुळे भडकल्या

News Desk

तुकाराम मुंढे यांची कोरोनाची लागण झाल्यानंतर पहिली पोस्ट

News Desk