HW News Marathi
महाराष्ट्र

अन्…अजित पवारांना अश्रू झाले अनावर

मुंबई | शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा काही संबंध नव्हता. शरद पवार हे तर शिखर बँकेचे सदस्य देखील नव्हते. तरी देखील त्यांच्यावर बँकेच्या करण्यात आलेली कारवाईही बिनबुडाची असल्याचे अजित पवारांनी काल (२८ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत म्हटले. शरद पवारांचे नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात आल्याने अस्वस्थ होऊन मी राजीनामा दिला.

ज्या पक्षाने मला मान-सन्मान व पदे दिली त्या पक्षाविरोधात काही करण्याचा विचारही करू शकत नाही, अशा शब्दात अजित पवारांनी आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिले. अजित पवारांनी शुक्रवारी( २७ सप्टेंबर) राजीनाम्यानंतर काल पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच भावनेचा बांध फुटून अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.

दरम्यान, अजित पवार म्हणाले की, “आताही २५ हजार कोटींचा घोटाळा काढलाय, म्हणजे तुम्हालाही वाटेल ह्या अजित पवारला काही हजार कोटींशिवाय जमतच नाही का?. अहो, मीही तुमच्यासारखा माणूसचं आहे, मलाही भावना आहेत, असे म्हणता अजित पवारांमधील भावनिक माणूस महाराष्ट्राला पाहायला मिळाला. अजित पवारांच्या डोळ्यात पाणी तरळले. तसेच या घोटाळ्याशी माझा संबंध नसून जाणीवपूर्वक मला विरोधात कारवाई केले जाते, असेही अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

गृहकलह अजिबात नाही

अजित पवार यांनी तब्बल २० मिनिटे मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी १२ हजार कोटींच्या ठेवी असलेल्या शिखर बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झालाच कसा? असा सवाल अजितदादांनी केला. यावेळी त्यांनी कुटुंबातील गृहकला अजिबात नसल्याचा दावा पवारांनी केला. आमच्या कुटुंबात पवार साहेबांचा शब्द अंतिम असतो आणि त्यांचाच शब्द अंतिम राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांचा सन्मान हा शासनाचा बहुमान; कृषी पुरस्कारांच्या रकमेत करणार वाढ! – मुख्यमंत्री 

Aprna

मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर ! भातखळकरांची टीका

News Desk

“मी मास्क घालतच नाही…!” – राज ठाकरे

News Desk