HW News Marathi
महाराष्ट्र

नितेश राणेंनी उपअभियंत्यांच्या अंगावर ओतला चिखल

करकवली | गेल्या काही दिवसांपासून कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. या महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे प्रवासी प्रचंड त्रस्त झाल्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आज (४ जुलै) महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बांधलं आणि त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.

तसेच महामार्गाच्या कामामुळे वेळी झालेल्या चुकांमुळे काही दिवसांपूर्वी कणकवलीती बाजारपेठेमध्ये पाणी घुसले होते. दरम्यान, महामार्गावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी अखेर आज आपला रोष महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यासमोर व्यक्त केला. यावेळी आमदार नितेश राणे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरील पूलापासून जाणवली येथील पुलापर्यंत चालत नेत रस्त्याची सध्यास्थिती दाखवली. यानंतर महामार्गाच्या कामामुळे पडलेले खड्डे आणि चिखलासाठी उपअभियंता त्यांना चिखलाची आंघोळ घातली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘चिखलफेक’ आंदोलन बाळासाहेबांना नक्की आवडले असते !

News Desk

युवा सेनेचा एक शेंबडा हे प्रकरण मराठी विरुद्ध अमराठी करण्याचा प्रयत्न करतोय – निलेश राणे

News Desk

रावसाहेब दानवेंचा राज्य सरकारला इशारा -“पुढच्या ८ दिवसात शेतकऱ्यांना मदत न केल्यास…”

News Desk