परळी | राज्यात आज (१८ जानेवारी) ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आहे. आज सगळ्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला आहे. तालुक्यातील एकूण ७ ग्रामपंचायत मध्ये मतदान झाले. त्या पैकी ६ ठिकाणी राष्ट्रवादीचा विजय झाला आहे.जगमित्र या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू झाला आहे.
लाडझरी- राष्ट्रवादी
मोहा- राष्ट्रवादी
गडदेवाडी- राष्ट्रवादी
सरफराजपुर- राष्ट्रवादी
रेवली- बिनविरोध- राष्ट्रवादी
वंजारवाडी- बिनविरोध- राष्ट्रवादी
भोपळा- भाजप
परळी पाठोपाठ आता अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकितही धनंजय मुंडे व राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. अंबाजोगाईत निवडणूक झालेल्या ५ पैकी ३ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. ३ ग्रामपंचायतीवर आधीच राष्ट्रवादी बिनविरोध निवडून आली होती.
१)मुर्ती- राष्ट्रवादी
२)वाकडी – राष्ट्रवादी
३)हनमंतवाडी – राष्ट्रवादी
*निवडणुक झालेल्या*
दत्तपुर एकुण ७ जागा
राष्ट्रवादी २ – भाजप ५
अंबलवाडी ७ जागा
राष्ट्रवादी २
संमिश्र ४
१ निकाल राखीव
लाडझरी- राष्ट्रवादी
मोहा- राष्ट्रवादी
गडदेवाडी- राष्ट्रवादी
सरफराजपुर- राष्ट्रवादी
रेवली- बिनविरोध- राष्ट्रवादी
वंजारवाडी- बिनविरोध- राष्ट्रवादी
भोपळा- भाजप