HW News Marathi
महाराष्ट्र

अन् खडसेंनी चुकून दोन वेळा केला ‘भाजप’चा उल्लेख

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करण्याऐवजी चुकून भाजपचा उल्लेख केला आहे. यावेळी शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी खडसेंना त्यांची चूक दुरूस्त करू दिली आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पत्रकार परिषदेत म्हणाले. बँकेच्या निवडीबाबत सहकार पॅनलची अजिंठा विश्राम गृहात बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षपदी खडसे होते.

दरम्यान, बँकेचे अध्यक्षपद तीन वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. तर दोन वर्षे शिवसेनेकडे असणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार हे अद्याप कळाले नाही. जळगावमध्ये अजिंठा शासकीय विश्रामगृत बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खडसेंनी भाजचा उल्लेख केला आहे.

खडसेंनी गेली ४० वर्षे भाजपमध्ये काम केला असून भाजपमध्ये त्यांनी अनेक पदे भूषविली आहे. परंतु, घोटाळ्याचा आरोप आल्यानंतर खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर खडसेंचे पक्षांतर्गत वाद झाल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते वकिली करतात” – संजय राऊत

News Desk

नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावा?, नितेश राणेंचा रोहित पवारांना टोला

News Desk

दिवाळीनंतर बॉम्ब फोडणाऱ्यांना तोंड लपवायला जागा उरणार नाही- संजय राऊत

News Desk