HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार यांची विधीमंडळ गटनेते पदावरून उचलबांगडी तर जयंत पाटील यांची नियुक्ती

मुंबई। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या अनपेक्षित घटनेने राज्याच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. अजित पवार यांनी पक्षासोबत केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काल (२३ नोव्हेंबर) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांची विधीमंडळ नेते पदाची निवड रद्द केली असून त्यांच्याकडून विहीर जारी करण्याचे अधिकार देखील काढून घेण्यात आले. तसेच पक्षाचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देण्याचा ठरावही या बैठकीत घेण्यात आला.

राष्ट्रवादीने अजित पवारांची ३० ऑक्टोबर २०१९ रोजी विधीमंडळ पक्षनेते पदी निवड करण्यात आली होती. मात्र त्यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली. ते पक्षाच्या ध्येय धोरणांशी सुसंगत नाही. यामुळे अजित पवार यांच्याकडे असलेले व्हिप बजावण्याचे अधिकार रद्द करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे ८ आमदार पुन्हा पक्षात परतले

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहे.

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या बैठकीला जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांसह इतर नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या बैठकीला ५४ आमदारांपैकी ४२ आमदारांची उपस्थितीत होते. तर अजित पवारांसोबत गेलेल्या ११ आमदारांपैकी

८ आमदारही बैठकीला हजर होते. यशवंतराव चव्हाण सेंटरवर ही बैठक पार पडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विलेपार्ले स्टेशन परिसरातील इमारतीला भीषण आग

News Desk

मोठी बातमी! वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

News Desk

’12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात फडणवीस म्हणाले…..’

News Desk