HW News Marathi
Covid-19

निलेश लंकेंनी शरद पवारांच्याच पावलावर पाऊल ठेवलंय ! जयंत पाटलांकडून कौतुक

मुंबई । राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लंके यांची विशेष दखल घेतली जात आहे. निश्चितच निलेश लंकेंचं हे काम राष्ट्रवादीसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार अशा सर्वच नेत्यांनी लंके यांच्या कामाला आपल्या कौतुकाने बळ दिलेलेच आहे. तर आता स्वतः प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देखील थेट लंकेनी उभारलेल्या कोविड सेंटरला भेट दिली आहे. कोविड सेंटरच्या पाहणीसोबतच यावेळी जयंत पाटील यांनी लंके यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निलेश लंके यांनी उभारलेल्या शरद पवार आरोग्य मंदिराला भेट दिली. यावेळी निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक करताना जयंत पाटील म्हणाले की, “निलेश लंके हे शरद पवारांचे खरे कार्यकर्ते शोभून दिसत आहेत. एखाद्याला कोरोना झाला असे कळले की जवळची कुटुंबातली माणसे सुद्धा अनेकदा मदत करायला कचरतात असेही अनुभव लोकांना आले आहेत. मात्र, निलेश लंके इथे हजारो लोकांची सेवा करत आहेत, आनंद देण्याचा प्रयत्न करत आहेत. निलेश लंकेनी शरद पवार यांच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे”, असे म्हणत जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षातर्फे निलेश लंके यांचे अभिनंदनही केले.

खरंतर सर्व पक्षीय नेत्यांकडून निलेश लंके यांच्या कामाची वाहवा होत आहे. राज्य आणि देशच काय तर जगभरातून दखल घेतली जात आहे. मदतीचा ओघ सुरूच आहे. शरद पवार यांच्या नावे कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारून स्वतः निलेश लंके तिथे राहतायत. आतापर्यंत निलेश लंकेचे काम सर्वत्र पोहोचलंय. त्यांचे हे काम निश्चितच सर्वसामान्य लोकांसाठी मोठा आधार आहे.

पहा संपूर्ण व्हिडीओ :

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगात कोरोनाची लस घेणाऱ्या पहिल्या पुरुषाचा झाला मृत्यू

News Desk

पुणे शहरात आज नवीन ३१८ रुग्णांची नोंद, एकूण संख्या ५ हजार ८५१ वर

News Desk

राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

News Desk