HW News Marathi
महाराष्ट्र

सिंहावलोकन करायची वेळ!; राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे अज्ञातवासात?

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी काही दिवसांसाठी एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत स्वतः च याबाबतची माहिती दिली आहे. अमोल कोल्हे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, “सिंहावलोकन करायची वेळ. घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही!” दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उधाण आलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये अमोल कोल्हे म्हणतात की, “गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलंही उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल, पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन!”

https://www.facebook.com/527035653979629/posts/5230534433629704/

त्यापुढे अमोल कोल्हे म्हणतात की, “घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू. नव्या जोमाने, नव्या जोशाने!”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते – जयंत पाटील

News Desk

मरकजमध्ये सहभागी झालेल्या १४०० पैकी फक्त ५० जण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

स्वपक्षाच्या उमेदवाराविरोधात मतदान करून सेनेला ‘जोर का झटका’

News Desk