HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांकडूनही अमोल कोल्हेंची पाठराखण

मुंबई | ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हेंची पाठराखण केली आहे. कोल्हेंनी एक कलाकार म्हणून ही भूमिका केली आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. 

शरद पवार म्हणाले, “गांधी सिनेमा हा संपूर्ण जगात गाजलेला सिनेमा होता. त्या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेंची कोणत्या तरी भूमिका साकारली होती. ज्या ती भूमिका केली तो कलाकार होता, आणि तो कलाकार नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही चित्रपटात कलाकार म्हणून भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावे.” आता छत्रपती शिवाजी महाराजांवर साकारलेल्या चित्रपटात एखाद्या अभिनेत्यांने औरंगजेबाची भूमिका केल्यामुळे तो मुघल साम्राज्याचा समर्थन करत नाही. तो कलाकार म्हणून तो भूमिका घेतो.  ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

‘व्हाय आय किल्ड’ या चित्रपटाचे चित्रीकरण २०१७ मध्ये झाले होते. त्यावेळी मी राजकारणात सक्रिय नव्हतो. तेव्हा नथूराम गोडसेची भूमिका साकारली होती. कलाकार जेव्हा एखादी भूमिका करतो. तेव्हा तो कलाकार त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे नाही. मी केवळ एक कलाकार म्हणून ही भूमिका साकारली असून यांचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडणे हे योग्य नाही, असे अमोल कोल्हे म्हणाले.

भूमिका साकारने यात मला काही चुकीचे वाटत नाही – चंद्रकांत पाटील

कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “एक अभिनेता म्हणून त्यांना नथुराम गोडसेची भूमिका साकारने यात मला काही चुकीचे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले. पाटील पुढे म्हणाले, “पण, कोल्हेंनी ते नथुराम गोडसेंच्या विचाराशी ते किती सहमत आहेत का?, हे त्यांनी एकदा जाहीर करावे. एक अभिनेता म्हणून ते कोणतीही भूमिका साकारू शकतात. नथुराम गोडसे ते अफझल खानचीही भूमिका साकारू शकतो. यात काही होते,” ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उद्धव ठाकरे इलेव्हन’ दिवाळीपर्यंत तुरुंगात, किरीट सोमय्यांचा इशारा!

News Desk

बंडातात्या कराडकर ‘गनिमी काव्याने’ पंढपूरला जाणार, पोलीस झाले सतर्क

News Desk

मनसेच्या आपत्ती व्यवस्थापनाची राज ठाकरेंकडून घोषणा, कसं असेल पथक?

News Desk