HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेची ‘ती’ भूमिका आम्हाला पटलेली नाही !

पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या’ मनसेच्या भूमिकेवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या ईव्हीएमच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, एकीकडे गेल्या अनेक महिन्यांपासून येत्या विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’ आघाडीसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. राष्ट्रवादी त्यासाठी विशेष प्रयत्नशील असल्याचेही दिसत होते. मात्र, आता दुसरीकडे ईव्हीएमविरुद्ध टोकाची भूमिका घेत विधानसभा निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याच्या मनसेच्या भूमिकेशी आपण सहमत नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

“ईव्हीएमविरुद्ध मनसेची भूमिका आग्रही आहे. विधानसभा निवडणुकांवरच बहिष्कार टाकण्याची मनसेची भूमिका आम्हाला फारशी पटलेली नाही”, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. “मी या मुद्द्यावर दिल्लीतही अनेक पक्षांशी बोललो आहे. प्रत्येक पक्ष ईव्हीएमविरुद्ध आक्रमक आहे, ईव्हीएमबाबत त्यांच्यात तीव्र नाराजी देखील आहे. मात्र, थेट निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची मनसेची भूमिका आम्हाला मान्य नाही”, असे शरद पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री नेमकं कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार? प्रकाश आंबेडकरांचा सवाल 

News Desk

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पुजा-यांच्या परिक्षेला सुरुवात

swarit

हिंगणा विधानसभा मतदारसंघातील अनेक भाजप नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk