HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’ पावसातल्या सभेवेळी कॅमेरामन म्हणाला, दीड लाखांचा कॅमेरा आहे, भिजला तर भरुन द्या !

मुंबई । राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यात झालेल्या भर पावसातील सभेची मोठी चर्चा झाली. शरद पवारांचे पावसातील ते भाषण प्रचंड गाजले. याच पावसातील सभेदरम्यान झालेला एक किस्सा आज (१९ फेब्रुवारी) राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी मुंबईत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सांगितले आहेत. शरद पवारांचा त्या पावसातील भाषणाचा फोटो काढणाऱ्या कॅमेरामनने आपल्याला कॅमेराचे दीड लाख रुपये भरुन देण्याबाबत कशी विचारणा केली होती, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी हा मजेदार किस्सा सांगितला.

सुप्रिया सुळे त्यावेळचा प्रसंग सांगताना म्हणाल्या की, “शरद पवार यांची साताऱ्यातील सभा पावसात झाली आणि यशस्वी झाली. मात्र, त्या ठिकाणी माध्यमांचा एकही माणूस नव्हता. पाऊस आहे त्यामुळे सभा होणार नाही, रद्द होईल असे समजून सर्व पत्रकार निघून गेले होते. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा मीडिया सेलचा माणूस तिथे होता. त्याने शशिकांत शिंदेंना फोन केला सभा होणार आहे की नाही ? असं विचारलं. शशिकांत शिंदेंनी त्यांना सभा होणार आहे सांगितलं. तो म्हणाला माझा कॅमेरा दीड लाखांचा आहे, पावसात माझा कॅमेरा खराब झाला तर तुम्हाला भरपाई लागेल. त्यावेळी शशिकांत शिंदेंनी कॅमेरा भरुन देईन असे सांगत शुटिंग करायला सांगितले.”

त्यापुढचा किस्सा सांगताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की , “त्यानंतर तो कॅमेरामन दीड लाख रुपयांचा कॅमेरा पावसात घेऊन काळजीने बसला. त्यामुळे, त्याला या देशातला टर्निंग पॉईंटचा सर्वात मोठा फोटो मिळाला. नियतीच्या मनात काय असतं ते कुणालाही माहिती नसतं. त्यामुळे एखाद्या चांगल्या कारणासाठी तुम्ही लढला तर त्याचा परिणाम चांगला होता”, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या त्या पावसातील सभेच्या फोटोचा हा किस्सा सांगितला आहे.

साताऱ्याच्या ‘त्या’ पावसातील सभेनंतर शशिकांत शिंदे “सॉरी” म्हणाले !

“साताऱ्यात शरद पवार यांच्या त्या पावसातील सभेनंतर मला शशिकांत शिंदे यांचा फोन आला. “ताई मी सॉरी म्हणायला फोन केला आहे. आम्ही सभा केली आणि साहेब त्यात पूर्ण भिजले. मी कपाळाला हात लावला आणि म्हणाले माझे वडील ८० वर्षांचे आहेत, पायाला जखम झालीय. पण मी आणि साहेबांनी एकदा ठरवलं लढेंगे तो पुरी ताकदसे लढेंगे, नही तो नही”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज घेणार राज्यपालांची भेट

News Desk

बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपातांच्या घटनांबाबत कडक कारवाई करा! – नीलम गोऱ्हे

News Desk

शिवसेनेची मोठी घोषणा, नाशिक मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी

News Desk