HW News Marathi
महाराष्ट्र

धोरणात्मक बदलामुळे राष्ट्रवादी महाराष्ट्रात एक सक्षम पक्ष म्हणून पुढे येईल ! जयंत पाटील

अमरावती | “समाजात स्थान असलेल्या लोकांना आपल्याला पक्षात स्थान द्यायचे आहे. हा धोरणात्मक बदल आपण करायला हवा. हे जर झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात एक सक्षम पक्ष म्हणून पुढे येईल”, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा आजचा आठवा दिवस असून संवाद दौरा यात्रा आज (४ फेब्रुवारी) अमरावती येथे पोचली आहे.

“राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आम्ही सर्व निघालो आहे. कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेण्यासाठी, महाविकास आघाडीतील पक्षांशी ताळमेळ घालून देण्यासाठी ही संवाद यात्रा आहे”, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. “शरद पवारांच्या विचारांनी असंख्य तरुण आज प्रभावित झालेले आहेत. त्यांना राष्ट्रवादी विषयी आकर्षण निर्माण झाले आहे. या सर्व तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या छताखाली आणत राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी आपण काम करायला पाहिजे”, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

केंद्रीय अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा होती मात्र तोंडाला पाणी पुसण्याचे काम ! | अनिल देशमुख

“आपल्याला पक्षातील कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही सुचना केल्या ज्याचे पालन जर आपण केले तर अमरावती विभागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढू शकते” असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिला. केंद्रीय अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा होती मात्र तोंडाला पाणी पुसण्याचे काम सरकारने केले आहे अशी जोरदार टीकाही अनिल देशमुख यांनी यावेळी केली.

“राष्ट्रवादीची अमरावतीत जास्त ताकद आहे. आपण जर योग्य निर्णय घेतले, थोडासा प्रयत्न केला तर इथे आपल्या तीन जागा निवडून येऊ शकतात. येत्या काळात आम्ही सर्व दुरुस्त्या करू आणि राष्ट्रवादी परिवार मोठा करू”, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये लॉकडाऊनचा निर्णय होणार?

News Desk

सोलापूरचे पालकमंत्री बदलणार का? जयंत पाटील म्हणाले…

News Desk

ॲट्रॉसिटी ॲक्टला कमकुवत करणाऱ्या परिपत्रकाची अंमलबजावणी होणार नाही! – सिद्धार्थ हत्तिअंबिरे

Aprna