HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार कधी स्थापन होणार हे  भाजप-शिवसेनेलाच विचारा !

नवी दिल्ली | “विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना एकत्रित लढले होते. त्यांच्या युतीला बहुमतही मिळाले आहे. त्यामुळे सरकार कधी स्थापन होणार हे भाजप-शिवसेनेलाच विचारा,” असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळ मारून नेली. पवारांच्या या वक्तव्याने मात्र राजकीय वर्तुळा उलटसुलट चर्चांला उधाण आले आहे. पवार आज (१८ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेऊन राज्यात सत्ता स्थापनेवर चर्चा करणार होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पवार राज्यसभेत जात असताना पत्रकारांनी त्यांना घेरून प्रश्न विचाले की, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होईल असे बोलले जात आहे. शिवसेनेसोबत सरकार स्थापन होईल असे वाटतेय, यावर उत्तर देताना पवार म्हटले की, “विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना एकत्रित लढले होते. त्यांच्या युतीला बहुमतही मिळाले आहे. त्यामुळे सरकार कधी बनणार हे भाजप-शिवसेनेलाच विचारा,” असे म्हणत वेळ मारण नेहली. पवार आज (१८ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेऊन राज्यात सत्ता स्थापनेवर चर्चा करणार होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते.

दरम्यान राज्यातील राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उद्या दिल्लीत जाणार आहेत. तर काँग्रेसचे नेते देखील दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. उद्या (१९ नोव्हेंबर) दुपारी राज्यातील नेत्यांची बैठक होणार आहे. आज शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर राज्यातील नेत्यांची बैठक होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंग यांच्या इशाऱ्याने वाझेकडून खंडणी वसुली, कार डिझायनर दिलीप छाबरियांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणार जिम, व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर्स

News Desk

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम, लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश

News Desk