HW News Marathi
Covid-19

पुण्यात नवी नियमावली जारी ! संध्याकाळी ५ वाजल्यानंतर लागू होणार संचारबंदी

पुणे । महाराष्ट्र कोरोनाच्या महाभयंकर संकटातून सावरत असताना हळूहळू कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत होती. हेच पाहता सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केलेत सरकार आणि प्रशासनाने मात्र नागरिकांना सवलती दिल्याने पुन्हा एकदा कोरोनाने महाराष्ट्रात हात पाय पसरवण्यास सुरुवात केली. आणि या सोबतच मृतांचा आकडा मध्ये देखील वाढ व्हायला सुरुवात झाली. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे.

पुणे शहराच्या नागरिकांसाठी काय असेल सुरू ?

पुणे शहरात आधीच्याच नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे. सोमवारपासून पुणेकरांना नवीन नियमांचं आता पालन करावं लागणार आहे. सोमवारपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावषक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील. पुण्यात सध्या दुकाने सात वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट, बार १० पर्यंत सुरु ठेवण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. अशी माहिती पुणे महापालीकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली तर या नव्या नियमावली बाबत महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

१) अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने दररोज दुपारी ४ पर्यंत सुरु राहतील.

२) अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त असलेले सर्व दुकाने हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत सुरु राहतील.

३) मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद

४) रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. दुपारी चार नंतर आणि शनिवार-रविवारी पार्सल सेवा सुरु ठेवण्यास मुभा.

५) लोकल ट्रेनमधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील, शासकीय कर्मचारी, बंदरे सेवा, विमानतळ सेवा यांना प्रवास करण्यास परवानगी

६) उद्याने, खुली मैदाने, चालणे, सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत सुरु राहील.

७) सर्व खासगी कार्यालयांमध्ये फक्त ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक, तसेच कार्यालये फक्त संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.

८) शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील.

९) सर्व आऊटडोअर स्पोर्ट्स सकाळी ५ ते ९ या दरम्यान सुरु राहतील.

१०) सामाजिक, धार्मिक आणि मनोरंजनाचा कार्यक्रम फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी. कार्यक्रम फक्त 3 तासांचा असावा. याशिवाय या ठिकाणी खाद्यपदार्थाचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

११) धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद. फक्त पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी परवानगी

१२) लग्नासाठी ५० लोकांची परवानगी

१३) अंत्यसंस्कार, दशक्रियाविधी किंवा त्याच्याशी संबंधित कार्यक्रमांसाठी फक्त २० लोकांना परवानगी

१४) कामगारांची राहण्याची व्यवस्था असेल त्याचठिकाणी बांधकाम सुरु राहील.

१५) कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालांची विक्री करणारे दुकाने, गाळे हे आठवड्यातील सातही दिवस संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मीपण विरोधी पक्षनेता होतो पण फडणवीसांसारखा कुत्र्या-मांजराचा खेळ खेळलो नाही,खडसेंची टिका

News Desk

महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्याने ३१ मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन

News Desk

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या ‘आप’च्या मागणीला भाजपचे समर्थन

News Desk