HW News Marathi
महाराष्ट्र

Live Update : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न, २८२ आमदारांनी घेतली शपथ

मुंबई | राज्यात गेल्या महिनाभर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. महाविकासआघाडीने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. हॉटेल ट्रायडंटमध्ये काल (२६ नोव्हेंबर) महाविकासआघाडीची संयुक्त बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीनंतर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोशियारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ उद्या (२८ नोव्हेंबर) संध्याकाळी ५ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा शिवातिर्थावर पार पडणार आहे.

Live Update

  • विधानसभेतील २८८ आमदारांपैकी २८२ आमदारांचा शपथविधी घेतली असून फक्त ६ आमदार गैरहजर राहिले आहे
  • विधीमंडळाचे कामकाज संपले, सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीसोहळा संपन्न
  • येत्या काळात नवा महाराष्ट्र घडवणार आहे- आदित्य ठाकरे
  • संधी दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे मानले आभार – ठाकरे

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता
  • महाविकासआघाडीची १२ वाजता बैठक
  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, केसी वेणुगोपाल आज शरद पवारांना भेटणार
  • हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा महाविकास आघाडीला पाठिंबा
  • उद्यापासून पत्रकार परिषद घेणार नाही: संजय राऊत
  • अजित पवार राजीनामा देणार आणि पुन्हा येणार हे मी आधीच सांगितले होते – संजय राऊत
  • मी चाणक्य वगैरे नाही; मी एक लढाऊ योद्धा आहे – संजय राऊत
  • मंत्रालयानंतर पुढचं सूर्ययान दिल्लीतही उतरेल – संजय राऊत
  • महाराष्ट्राने देशाला नवा मार्ग दाखवलाय – संजय राऊत
  • शिवरायांचा महाराष्ट्र झुकणार नाही – संजय राऊत
  • उपमुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
  • सर्वांच्या सहमतीनं हे सरकार बनतंय, त्यामुळे आम्ही ५ वर्षांसाठी राज्याला स्थिर सरकार देऊ – अशोक चव्हाण
  • उद्धव ठाकरे राजभवनात दाखल, राज्यपालांची भेट घेतली

  • काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आमदारकीची शपथ घेतली
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली
  • जयंत पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली
  • उद्धव ठाकरे ‘मातोश्री’हून राजभवनाकडे रवाना, घेणार राज्यपालांची भेट
  • माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आमदारकीची शपथ
  • माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आमदारकीची शपथ
  • विधीमंडळात आमदारांच्या शपथविधीला सुरुवात
  • सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची गळाभेट
  • पवार साहेब माझे नेते आहेत आणि त्यांचे ऐकणं माझी जबाबदारी – अजित पवार
  • मी राष्ट्रवादीतच होतो आणि कायम राष्ट्रवादीतच राहीन – अजित पवार
  • सध्या काहीही बोलायचं नाही, मी योग्यवेळी बोलेन – अजित पवार
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांचे स्वागत
  • सकाळी ९ वाजता उद्धव ठाकरे राज्यपालांची भेट घेणार
  • अभी तो पुरा आसमान बाकी है… संजय राऊत यांचे नवे ट्विट

सकाळी आठ वाजता विधानभवनात सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार

विधीमंडळाचे आज विशेष अदिवेशन बोलविण्यात आले असून आज नवनिर्वाचित सर्व आमदार शपथ देण्यात येणार आहे.

२७ नोव्हेंबर Live Update

  • उद्धव ठाकरे हे महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री असणार आहेत
  • १ डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा, शिवतीर्थावर होणार आहे.
  • शिवसेनेचे आमदार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल झाले
  • महाविकासआघाडीचे आमदार उद्या सकाळी ८ वाजता घेणार शपथविधी
  • महाविकासआघाडीची सायंकाळी ६ वाजता बैठक
  • विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष पदी कालीदास कोळंबकर यांची नियुक्ती, राज्यपालांनी केली आहे.
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या (२७ नोव्हेंबर) घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, तर काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ
  • मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासा देवेंद्र फडणवीस राजभवनाच्या दिशेने रावाना
  • आम्ही प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करू – फडणवीस
  • अजित पवारांनी मझ्याकडे राजीनामा दिला, त्यामुळे आमच्या कडे बहुमत नसल्यामुळे मी सरकार स्थापन करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले
  • आम्ही कोणतेही घोडोबाजार करणार नाही,
  • सत्तेसाठी शिवसेना लाचारी स्वीकारत, त्यांना लाचारीचा लखलाभ आहे – फडणवीस
  • हे तिन्ही पक्ष स्थापन करून शकलो नाही, म्हणून अजित पवार यांनी फोन करून आम्ही पक्ष स्थापन केला आहे – फडणवीस
  • भाजपला दूर ठेवण्यासाठी हे तिन्ही वेगवेगळ्या विचार धारेचे पक्ष एकत्र येऊन कामन मिनिम प्रॉग्रेम आखला होता. – फडणवीस
  • राज्यपालांनी मोठा पक्ष म्हणून आमंत्रण दिले, मात्र आम्ही सरकार स्थापन करून शकलो नाही, यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्यास निमंत्रण दिले मात्र, ते सरकार स्थापन करू शकले नाही. मगा राज्यात सरकार स्थापन केले आहे.
  • ठरले ते देऊन जे ठरले ते कसे देणार असे फडणवीस म्हणाले
  • शिवसेनेने आकडे बघून बार्गेंनिक केली- फडणवीस
  • जी गोष्ट ठरली नाही ती गोष्ट शिवसेनेनी मागीतली – फडणवीस
  • आमच्याशी चर्चा न करता इतर पक्षासोबत जाण्याचे सांगितले. – फडणवीस
  • जनतेने दिला जनादेश हा भजापला बुहमत होता असा दावा फडणवीस यांनी केला आहे
  • महाराष्ट्राच्या जनतेने युतीला संपूर्ण बहुमत दिले, १०५ जागा दिल्या – फडणवीस
  • फडणवीस यांचा पत्रकार परिषद सुरू
  • अजित पवार हे आमच्यासोबत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुढील ५ वर्ष मुख्यमंत्री असणार आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे

  • दुपारी ३.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद, सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे तर देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे

  • काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षाची सायंकाळी ५ वाजता बैठक, या बैठकीत तिन्ही पक्ष मिळून एकच गटनेता निवडणार आहे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – एकनाथ शिंदे
  • देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यावर अजित पवार बंधू श्रीनिवास पवारांच्या घरी रवाना
  • आजची लोकशाही येणाऱ्या काळाचे भविष्य ठरवणार आहे, अजित पवारांचे सूचक ट्विट

  • काँग्रेसच्या गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

  • काँग्रेस आमदारांच्या बैठकीला मुंबईत सुरुवात
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत: रावसाहेब दानवे
  • भाजपचे आमदार रात्री ९ वाजता गरवारे क्लबमध्ये एकत्र जमणार
  • भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक संपली
  • संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट – सुप्रिया सुळे

  • शिवसेना आमदारांच्या बैठकीला हॉटेल लेमन ट्रीमध्ये सुरुवात
  • देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी अजित पवार ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले
  • सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे संविधान दिनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली – शरद पवार

  • बहुमताची चाचणी उद्या होणार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, उद्या सायंकाळई ५ वाजता होणार आहे.
  • बहुमताची चाचणी ही गुप्त मतदान होणार नाही, तर लाईव्ह टेलिकास्ट करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दिला आहे

  • सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सुनवाणीला सुरुवात होणार
  • अजित पवार हे जागतिक पातळीवरचे नेते आहेत. त्यांनी क्रांतिकारक काम केलंय – राऊत
  • भाजपमध्ये खूप मोठे नेते आहेत. ते भारतात बसून रशियासुद्धा चालवू शकतात- राऊत
  • काल आमच्याकडं १६२ आमदार होते, बहुमत चाचणीच्या वेळी १७० होतील – राऊत
  • जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे अधिकृत विधीमंडळ गटनेते – राऊत
  • काल शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसनं जे काही केलं ते शक्तिप्रदर्शन नव्हतं. तो एक सत्याचा प्रयोग होता – राऊत
  • एक भगतसिंह देशासाठी फासावर गेले, दुसऱ्या भगतसिंहांनी लोकशाहीची हत्या केली – राऊत
  • राज्यपालांना बनावट पत्र दाखवून भाजपनं राज्यघटनेची हत्या केलीय, संजय राऊत यांचा आरोप
  • शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू
  • राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेते पदी जयंत पाटीलच अधिकृत असल्याची विधिमंडळ सचिवांची माहिती
  • जयंत पाटील यांची गटनेतेपदी नोंदणी नाही, अजित पवारच राष्ट्रवादीचे गटनेते भाजपची ठाम भूमिका
  • संजय राऊत यांचं नवं ट्विट

  • अजित पवार हॉटेल ट्रायडंटला पोहोचले
  • भाजपच्या कोअर कमिटीची सकाळी ११ वाजता ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक
  • शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज (२६ नोव्हेंबर) सकाळी साडेदहा वाजता निर्णय देणार

२६ नोव्हेंबर LIVE Update

  • राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्याशी आम्ही प्रामाणिक राहू, आम्ही भाजपला फायदा होईल असे कोणतेही कृत्य करणार नाही, अशी शपथ महाविकासआघाडीचे १६२ आमदारांना देण्यात आली आहे.
  • हा गोवा नाही तर महाराष्ट्र आहे, कोणतीही चुकीची गोष्ट खपवून घेणार नाही – शरद पवार
  • बहुमत नसतानाही अनेक राज्यात सत्ता स्थापन केली आहे – शरद पवार
  • आता महाराष्ट्राची वेळ आली – शरद पवार
  • सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करायला सांगितले की करू – शरद पवार
  • नवीन सदस्यांच्या मनात संशय निर्माण केला जात आहे. – शरद पवार
  • व्हिपचा अधिकार पक्षाला बाजूला काढू शकत नाही – शरद पवार
  • अवैध पद्धतीने सत्तेवर आलेल्यांना बाजूला करू – शरद पवार
  • आम्ही आलेलो आहोत, शिवसेनेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थिती महाविकास आघाडीच्या आमदारांना संबोधित केले.
  • सेना समोर आली तर काय होते हे आम्ही दाखून देऊन – उद्धव ठाकरे

https://www.facebook.com/hwnewsmarathi/videos/467687913873348/?t=5

 

महाविकासआघाडीचे हॉटेल ग्रँड हयातमध्ये शक्तीप्रदर्शन
  • आम्ही १६२ हून अधिक आहोत, बहुमत महाविकास आघाडीकडे आहे, असे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण म्हणाले
  • काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे दिग्गज नेते हयात हॉटेलमध्ये उपिस्थती झाले आहेत.
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ग्रँड हयातमध्ये दाखल झाले आहेत.
  • शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार ग्रँड हयात दिशेने रवाना झाले आहेत.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ग्रँड हयातमध्ये दाखल आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील आहेत.
  • महाविकासआघाडीचे १६२ आमदार आज सायंकाळी ७ वाजता हॉटेल हयातमध्ये पहिल्यांदा एकत्र येणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

  • देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाभार स्वाकारला, मात्र, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नाही.
  • अजित पवार यांच्याशी जवळपास ४ तासाच्या बैठकीनंतर विधीमंडळातून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील बाहेर पडले.
  • महाराष्ट्रातील सत्ता स्थापनचे पेचावर उद्या सकाळी १०.३० वाजत सर्वोच्च न्यायालय देणार अंतिम फैसला

  • सकाळी आठ वाजता शपथविधी करण्यासारखे काय राष्ट्रीय संकट ओढवले होते? राष्ट्रपतींना रात्री अहवाल पाठवून सकाळी ५.४७ वाजता राष्ट्रपती राजवट उठवली? आतापर्यंत सबुरीने काम करणाऱ्या राज्यपालांनी अचानक एवढी घाई का केली? – कपिल सिब्बल
  • राज्यपालांनी पत्राच्या आधारे निर्णय घेतला – न्यामुर्ती
  • तुम्ही राष्ट्रपती राजवट उठवण्याला आव्हान दिलेलेच नाही : मुकूल रोहतगी
  • २२ नोव्हेंबरला तिन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषदे घेतली.
  • मुख्यमंत्र्यांकडे बहुमत आह का- सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
  • आता एक पवार आमच्यासोबत आहेत, दुसरे पवार दुसऱ्या बाजूला आहेत. त्यांच्या कौटुंबिक भांडणाशी आमचं काय संबंध? – मुकूल रोहातगी
  • देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १७० आमदारांचे समर्थन, भाजपचे १०५ राष्ट्रवादीचे ५४ त्यामुळे आमदार फोडाफोडीचा प्रश्नच नाही – तुषार मेहता
  • मी अजित पवार राष्ट्रवादीचा गटनेता आहे, मला सगळ्या आमदारांचे समर्थन आहे,अजित पवारांच्या पत्रातील मजकूर
  • सर्व पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी नकार दिल्यावर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली – तुषार मेहता
  • राज्यपालांनी प्रत्येकाला योग्य वेळ दिला – तुषार मेहता
  • अजित पवार यांनी २२ नोव्हेंबर रोजी राज्यपालांना दिलेल्या पत्राची प्रतही तुषार मेहता यांनी सादर केली
  • देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित करणारे राज्यपालांचे पत्र तुषार मेहता यांनी खंडपीठाकडे सोपवले
  • राज्यपालांच्या निर्णयाची प्रत अॅड. तुषार मेहतांनी कोर्टात केली सादर
  • महाराष्ट्रातील सत्तापेचावर थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला होणार सुरुवात
  • शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
  • उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी अजित पवार मंत्रालयाकडे रवाना
  • देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज पदभार स्वीकारणार
  • आमचा आरोग्यमंत्री झाल्यावर आम्ही वेड्यांची इस्पितळे उभारू – संजय राऊत
  • सत्ता न मिळाल्यास भाजप नेते वेडे होतील – संजय राऊत
  • विधानसभेत विश्वास दर्शक ठरावावेळी आमचा बहुमताचा आकडा तुमच्यापेक्षा १० ने जास्त असेल: संजय राऊत
  • आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही सत्ता स्थापन करू – संजय राऊत
  • बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सत्ता स्थापन केली – संजय राऊत
  • यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी बदनाम केले – संजय राऊत
  • आम्ही भाजपला पुरून उरू – संजय राऊत
  • भाजपने शिवसेनेला दिलेले वचन पाळले नाही; अजित पवारांसह व्यवहार केला – संजय राऊत
  • राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गुडगावमध्ये ठेवण्यात आले, धमकावण्यात आले – संजय राऊत
  • अजित पवार यांना भाजपकडून अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याची चर्चा – संजय राऊत
  • अजित पवारांशी माझे कुठलेही बोलणे झालेले नाही – शरद पवार
  • अजित पवारांच्या बंडामागे माझा हात असता तर मी सहकाऱ्यांना सांगितले असते. ते माझ्या सूचनेचा अनादर करतात असा माझा अनुभव नाही – शरद पवार
  • संकटे येतात. अडचणी येतात. त्यातून मार्गही निघतो. महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोक अशा प्रसंगी नेहमीच भक्कमपणे उभे राहिले आहेत. जोपर्यंत महाराष्ट्रातील सामान्य माणसाचा मला पाठिंबा आहे, तोपर्यंत चिंता नाही – शरद पवार
  • शपथ घेतल्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदभार स्वीकारू शकतात. मुद्दा त्यांची निवड कायदेशीर आहे की नाही हा आहे – शरद पवार
  • केंद्रातील सत्तेचा गैरवापर आणि राजभवनाच्या संकेतांना हरताळ फासून भाजपने आपले वेगळेपण दाखवून दिलेय; शरद पवारांचा भाजपला टोला
  • अजित पवारांसोबत २७ आमदार असल्याचा भाजपचा दावा

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार मुंबईत परतले
  • भाजपला बहुमत मिळणार नाही, त्यांना आता बहुमत मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे- उद्धव ठाकरे यांची ‘सामना’तून टीका
  • अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरूच; राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ थोड्याच वेळात भेट घेणार
  • शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते राजभवनाकडे रवाना; आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना देणार
  • तुषार मेहता यांना फडणवीस सरकार स्थापनेबाबतची महत्त्वाची कागदपत्रं सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश
  • राज्यातील सत्तापेचावर आज सकाळी १०.३० वाजता सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

  • आमदार अनिल पाटील, नरहरी जिरवळ आणि दौलत दरोडा दिल्लीहून मुंबईत दाखल, राष्ट्रवादीचे इतर आमदार असलेल्या हयात हॉटेलमध्ये तिन्ही आमदार परतले.

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी निमित्ताने कराडला जाऊन आदरांजली वाहिली.
  • अजित पवार यांच्याकडे आता फक्त पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे, इतर सर्व आमदार राष्ट्रवादीच्या गोटात दाखल
  • अजित पवारांसोबत शपथविधीला उपस्थित असलेले आणि गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी तीन आमदार मुंबईत परतले

२५ नोव्हेंबर Live Update

  • अजित पवारांच्या ट्वीटला शरद पवारांचे प्रत्युत्तर ते म्हटले की, अजित पवारांचे ट्वीट हे दिशाभूल करणारे, असे म्हटले आहे. भाजपसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही. सरकारचे नेतृत्त्व शिवसेनेकडेच राहणार, असे ट्वीटमध्ये शरद पवारांनी म्हटले आहे.

  • भाजप-राष्ट्रवादी मिळून राज्याला स्थिर सरकार देऊ, आणि पुढील पाच वर्ष महाराष्ट्रात यशस्वी काम करेन, असे ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.

  • उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचे पहिले ट्वीट केले असून अजि पवार यांनी राज्यात स्थिर सरकार देऊ, असे आश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत त्यांचे आभार मानले. केंद्रीय कॅबिनेट मंत्री अमित शहा, कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.

  • उद्धव ठाकरे यांनी पवारांची भेट घेत, तुम्ही काळजी करून नका, आमची महाविकासआघाडीला खूप काळ टिकणार आहे.
  • भाजपची थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे
  • दुपारी तीन वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कॉंग्रेस आमदारांची भेट घेणार
  • अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू, यासाठी जयंत पाटील प्रेम कोर्ट निवासस्थान दाखल
  • काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या याचिकेवर उद्या (२५ नोव्हेंब) सकाळी १०.३५ वाजता सर्वोच्च न्यायालयात याचिका होणार आहे.
  • गेल्या १५ मिनिटापासून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. उद्या सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे
  • महाराष्ट्रात जे झाले ते लोकशाहीची हत्या, असा दावा अभिषेक मनू सिंघवी
  • गुप्त पद्धतनीने मतदान नको, थेट मतदान घ्या कर्नाटकच्या निकालाचा हवाला देत अभिषेक मनू सिंघवी यांची न्यायालयात मागणी
  • अजित पवार हे आमचे विधीमंडळ नेते नसल्याचे राज्यपालांना कळवले; ४१ आमदारांच्या स्वाक्षरींचे पत्र राज्यपालांना दिले, असे अभिषेक मनू सिंघवी सांगितले.
  • राष्ट्रपती राजवट कधी हटवली ते नाट्यय शपथविधी कसा झाला, असे न्यायालयात कपिल सिब्बल म्हणाले
  • रविवारी तातडीने सुनावणीची काहीही गरज नव्हती – मुकुल रोहतगी
  • तुषार मेहता आणि मुकुल रोहतगी भाजपकडून बाजू मांडता आहे.
  • काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची वकिल कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहे.
  • राज्यपाल आश्वस्त असतील तर आजच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्या, अशी मागणी कपिल सिब्बल न्यायालयात केली आहे.
  • राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिकेवर आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणीला सुरुवात झाली आहे.
  • शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या सकारात्मक प्रतिक्रिया, भाजपचे नेता आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच राष्ट्रवादीने अजित पवार यांनी विधीमंडळाच्या नेते पदावरून हकालपट्टी करणे हे अवैध असल्याचा दावा शेलार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केला आहे.
  • जयंत पाटील राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर, आमदारांचे पत्र घेऊन पाटील राजभवनाकडे निघाले
  • भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे जावून त्यांनी भेट घेतली
  • राष्ट्रवादीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर पोहोचले
  • राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिकेवर आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी
  • देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथ विधी सोहळ्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊ याचे ट्वीट

२४ नोव्हेंबर २०१९

  • राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्ष नेते पदावरून अजित पवारांची हक्कालपट्टी, त्यांच्याजागी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेध्याक्ष पदी यांची निवड करण्यात आली, राष्ट्रवादीने व्हीप जारी करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे,
  • आमदार दौलत दरोडा हरविल्याची कुटुंबाने पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
  • राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ, अनिल पाटील आणि दौलत दरोडा तीन जण बेपत्ता झाले आहेत.
  • वाय.बी.चव्हाण येथे राष्ट्रवादीच्या बैठकीला ५० आमदारांची उपस्थिती
  • ‘तातडीने विधानसभेचे अधिवेशन बोलवावे, अधिवेशनाचे संपूर्ण व्हिडीओ चित्रीकरण दाखवण्यात यावे’, याचिकेत मागणी
  • काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
  • काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना राज्यपालांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याची शक्यता
  • राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी सर्व आमदार वाय. बी. सेंटरमध्ये दाखल
  • राष्ट्रवादीचे ७ आमदार पुन्हा पक्षा परतले, यात माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, आदी यांनी ट्वीट करत पुन्हा पक्षात परतले.
  • माचा अजित पवारांवर विश्वास असल्याचे दिलीप बनकर यांनी ट्वीट करत म्हणाले

  • मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही.अजितदादा पवार यांच्या सांगण्यावरुन मी राजभवनावर गेलो होतो. गटनेते असल्याने आदेश पाळला.तिथे क़ाय होणार आहे याबाबत काहीच माहीत नव्हते.पण मी पक्षासोबत आहे. एकदा घेतलेला निर्णय आपण कदापीही बदलनार नाही.!

  • भाजपची पत्रकार परिषदेत, नवी युती स्थिर सरकार देणार,चोर दरवाज्याने सत्ता मिळविण्याचा आघाडीचा प्रयत्न, कायदा मंत्री रविशंकर शर्मा यांनी राष्ट्रवादी-शिवसेनेवर केला आहे
  • अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा पक्षविरोधी असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे
  • विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवारांची हकालपट्टी
  • उद्धव ठाकरे बैठकीसाठी वाय बी चव्हाण सेंटरकडे रवाना,
  • अशोक चव्हाण वाय बी सेंटरला पोहोचले आहेत
  • पक्ष आणि कुटुंबात फूट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस
  • शरद पवारांकडून राष्ट्रावादीच्या सर्व आमदारांना बोलावणे, संध्याकाळी साडेचार वाजता व्हायबी सेंटरला बैठक
  • शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे संयुक्त बैठक घेणार, संजय राऊत यांचे ट्वीट

  • ३० नोव्हेंबर भाजप-राष्ट्रवादीला बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली
  • अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे., राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांचे ट्वीट

  • अजित पवारांनी पाठित खंजीर खुपसले- संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे
  • आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ तर अजित पवार यांनी घेतील उपमुख्यमंत्री पदाची शपथ

२३ नोव्हेंबर २०१९

 

  • उद्या (२३ नोव्हेंबर) शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त पत्रकार परिषद होणार
  • काही कारणास्तव शरद पवार बैठकीतून बाहेर, अन्य नेत्यांमध्ये मात्र अद्याप चर्चा सुरूच
  • मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाला सर्वांची संमती
  • महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर तिन्ही पक्षातील नेते संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे
  • काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची नहेरू सेंटरमध्ये तिन्ही पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शिवसेनचे खासदार संजय राऊत दाखल झाले आहे.
  • महाविकासआघाडीचे सरकार टिकणार नाही, असा दावा कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांनी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे
  • राज्यात शिवसेनेसह महाविकासआघाडी स्थापन करण्यास महाआघाडीच्या मित्रपक्षांचा पाठिंबा दर्शविला आहे.

  • नुकतीच काँग्रेस-राष्ट्रवादीची मित्रपक्षांसोबतची बैठक पार पडली आहे.
  • मित्रपक्षांसोबत झालेल्या या बैठकीत सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा

  • काँग्रेस आमदारांच्या बैठकीला सुरूवात, या बैठकीसाठी अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, केके वेणुगोपाल मुंबईत दाखल झाले आहेत. काँग्रेसचे गटनेता निवडीचा अधिका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडे असल्याची माहिती मिळाली आहे
  • मातोश्रीवरील शिवसेना आमदारांची सव्वातासा सुरू असलेली बैठक संपली, या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याच नावावर चर्चा झाल्याची माहिती सेनेच्या आमदारांनी दिली. सेनेच्या आमदारांनी दिले आहे. तसेच शिवसेनेचे आमदार मुंबई एकत्र राहणार असल्याची माहिती सुनील प्रभू यांनी दिली
  • तिन्ही पक्ष एकत्र येऊन चर्चा करणार – काँग्रेस जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे
  • राष्ट्रवदीच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जेष्ठ नेते छगन भुजबळ आदी नेते मंडळी सिल्व्हर ओक येथे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकीला सुरुवात
  • मातोश्रीमध्ये शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या बैठकीला सुरूवात झाली आहे.
  • राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील नेत्यांसोबत बैठक होणार आहे.
  • शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर लिलावतीमध्ये नुकतीच अँजिओग्राफी झाली आहे. यानंतर आज राऊत चेकअपसाठी रुग्णालयात गेले आहेत.

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मातोश्रीवर त्यांच्या आमदारांची बैठक बोलविली आहे. या बैठकी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सत्ता स्थापने संदर्भात आमदारांची चर्चा करणार आहे.

  • मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक विराजमान होणार, असा पुनरुच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केला आहे. येत्या २ दिवसात अंतिम निर्णय होईल, असा दावा देखील राऊतांनी यावेळी केला आहे. पुढील पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री, असा ठाम विश्वास राऊत यांनी आज (२२ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

  • सत्ता स्थापनेआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (२२ नोव्हेबर) भेट ठरली होती. मात्र, उद्धव ठाकरे काल (२१ नोव्हेंबर) रात्री ११.२० वाजता शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक घेण्यात आली होती. ही बैठकी जवळपास १ तास सुरू होती. या बैठकीत नेमके काय झाले यांची अद्याप माहिती मिळाली नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री आज सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर

News Desk

‘महाराष्ट्राचे मंत्री ११ दिवस गायब’ जनता वाऱ्यावर आहेचं पण मंत्र्यांना तरी शोधा!

News Desk

सीबीआयचा वापर राजकीय कामासाठी होतो का? – अनिल देशमुख

News Desk