HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रातील पहिलेच आमदार! निलेश लंकेचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ कडून सन्मान

अहमदनगर। कोरोना या महामारीने हैदोस घातला होता. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. वाढत्या संख्येमुळे बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यावेळी अनेक रूग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून कित्येक लोकांना प्राण गमवावं लागला त्यावेळी अहमदनगरमध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी खऱ्या अर्थाने जनतेचा नेतृत्त्व करत आपल्या लोकांसाठी कोरोना सेंटर उभारत आधार दिला.

निलेश लंकेंच्या कोरोना सेंटरची चर्चा राज्यभर होती. त्यांनी भावळणी इथं तब्बल १ हजार १०० बेडचं कोविड सेंटर सुरु केलं. कोविड सेंटर उभारलं नाही तर निलेश लंके कोरोना रुग्णांवरील औषधोपचार, त्यांचा आहार आदी गोष्टींकडेही स्वत: वैयक्तिक डॉक्टरप्रमाणे लक्ष देत होते. निलेश लंकेंच्या कामाची चर्चा साऱ्या देशभर होतीच मात्र त्यांच्या कामाचा डंका सातासमुद्रापार गेला आहे. त्यांच्या या कामाचं कौतुक ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’कडून करण्यात आलं आहे. याबाबत निलेश लंके यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली. अशा प्रकारे सन्मान होणारे निलेश लंके महाराष्ट्रातील पहिले आमदार ठरले आहेत

कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान भेटला ही खुप मोठी गोष्ट आहे. हे सगळं माझ्यावर प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेमुळे आणि सहकारी यांच्यामुळे शक्य झाल्याचं निलेश लंके म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत १०७४ जण कोरोनामुक्त

News Desk

आजपासून राज्यभर रात्री ८ नंतर जमावबंदी, राज्याकडून गाईडलाईन जारी

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र सरकारचे कौतुक

News Desk