HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही जिथे कमी पडलो ते काम नानांनी केलं, बघूया शिवसेनेची किती औकात उरलीये,निलेश राणेंचा प्रहार

सिंधुदुर्ग | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही. तसंच सामना देखील वाचत नाही. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून संजय राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात. पण केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, हे कदाचित संजय राऊत यांना माहिती नसावं, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

नाना पटोले यांच्या या विधानानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात शिवसेनेला आव्हान दिलं आहे. ‘नानांनी कचराच करून टाकला… आम्ही जिथे कमी पडलो ते काम नानांनी करून टाकलं. संज्या राऊतला काडीची किंमत कुठेच नाही. असेल हिम्मत शिवसेनेत तर उद्याच्या सामन्यात किंव्हा एक तरी शिवसेनेच्या मंत्र्याने ह्यावर जशास तशी प्रतिक्रिया द्यावी. बघुया शिवसेनेची औकात किती उरली आहे,’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

दरम्यान, नाना पटोले यांच्या आणखी एका धक्कादायक विधानाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाची शक्तिस्थळे मजबूत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं विधान त्यांनी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीत केलं आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपीनाथ मुंडेच्या जयंती निमित्ताने पंकजा मुंडेंचे पत्रातून कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

News Desk

फडणवीस येत आहेत चांगली आहे, त्यांच्या ज्ञानात भर पडेल !

News Desk

सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारकी मिळवणारे मातब्बर नेते भारत भालके!

News Desk