HW News Marathi
महाराष्ट्र

…मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हू’, निलेश राणेंची राऊतांवर गंभीर टीका  

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यांना काल (२९ डिसेंबर) कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंतचा वेळ मागून घेतला असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच, ईडीकडूनही त्यांना नवीन समन्स बजावण्यात आले आहेत. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी, ‘माझ्याशी पंगा घेऊ नका. मी नंगा माणूस आहे’, अशी प्रतिक्रिया दिली होती. याच प्रतिक्रियेवरून आता माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, “संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘ मै नंगा हू’. एका नोटीसला इतका घाबरला संज्या.” याचसोबत, “शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले ‘आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल’. देशाबाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने?? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?? ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे”, असंही ट्विट करत त्यांनी शिवसेनेलाही कोपरखळी मारली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संविधानाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे पुन्हा लढा द्यावा लागेल | खा. अशोक चव्हाण

Adil

मुंबई, पुण्यातील लोकसंख्या कमी करण्याची गरज – प्रकाश आंबेडकर

News Desk

#CoronaVirus : मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचे ऐका, मुख्यमंत्र्यांचा सल्ला

swarit