HW News Marathi
महाराष्ट्र

मग आडनाव बॅनर्जी असुदे किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच, राणेंचा प्रहार

मुंबई | पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली पाहायला मिळत आहे. भाजपनेही आपली जागा मजबूत करण्यासाठी सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी पवार, ठाकरे आणि बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.

निलेश राणेंनी याबाबत ट्विट करत त्यामध्ये एका सभेचा व्हिडीओ टाकला आहे. या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसून येत आहे. त्यानंतर त्यांनी पवार, ठाकरे आणि बॅनर्जी यांना टोला लगावला आहे.

बंगालमध्ये भाजपची सभा.. एकदा लोकांनी ठरवलं कोणाला आडवं करायचं मग आडनाव बॅनर्जी असुदे किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच, असं राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, संज्या हे बघून ठेव, विसरू नको. अति तिथे माती होणारच, असंही राणेंनी म्हटलं आहे. राणेंनी केलेल्या या टीकेवर पवार आणि ठाकरे तसेच संजय राऊत काय आणि कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीने व्यक्त केली ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता

News Desk

कोणताही नवा प्रस्ताव नाही, निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदावर सहमती झाली होती !

News Desk

‘तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक’,फडणवीसांनी हात झटकले !

News Desk