HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाने ठाकरे कुटुंबाने महापौर बंगला लुटला

मुंबई | “स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नावाने मुंबई महापौर बंगला ठाकरे कुटुंबाने लुटला आणि रोज प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखी वापरत आहेत. पेंग्विन चे फोटो शूट, क्रिकेट व संध्याकाळच्या मीटिंग/कार्यक्रम ह्याच बंगल्यात होतात. मुंबईकरांच्या प्रॉपर्टीचा रोज दुरुपयोग होतोय”, अशी गंभीर टीका भाजपचे नेते निलेश राणेंनी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून निलेश राणेंनी ठाकरे कुटुंबावर जोरदार निशाणा साधला आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर बंगला निश्चित करण्यात आला आहे. २२ जानेवारी २०१९ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचे गणेशपूजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे, पूनम महाजन, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेना नेतेही उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांचे दादरमधील मुंबई महापौर बंगल्यात स्मारक उभारण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या २२ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या बैठकीत घेतला होता. त्यानंतर स्मारक उभारणीसाठी मुंबई पालिकेकडून स्मारक संस्थेला महापौर बंगल्याची जागा भाडेपट्ट्याने देण्यात आली. त्याची कागदपत्रे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ जानेवारी २०१९ रोजी बाळासाहेबांच्या जयंती दिनी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी संभाजीराजेंनी मांडले ३ पर्याय

News Desk

राजा प्रजेत गेला पाहिजे मात्र मुख्यमंत्री मी आणि माझं कुटुंब म्हणत घरी बसले आहेत- रावसाहेब दानवे

News Desk

एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ सीडीची मी वाट बघतोय!

News Desk