HW News Marathi
महाराष्ट्र

नऊ कोटी जनताच ठरविणार राज्याचे भविष्य, मतदानाला उत्साहात सुरुवात

मुंबई। राज्याच्या १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज (२१ ऑक्टोबर) मतदानाला सुरुवात सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सहकुंटुब मतदानाचा हक्क बजावला. तर केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांनी देखील सह कुटुंब मतदान केले. जास्तीतजास्त मतदान यासाठी निवडणूक आयोगा आणि राज्य सरकारने मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले गेले आहेत.

राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचा होता. तर आज देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जर आजही पावसाचा जोर कायम राहिला तर मतदारांना घराबाहेर कसे काढायचे असे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. तसेच मतदान सुरळीत पार पडावे यासाठी निवडणूक आयोग, पोलीस कर्मचारी सज्ज झाले आहेत.

लोकशाहीचा हा उत्सव सुरुळीत पार पडावा म्हणून ४ लाख पोलीस तर ६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांची फौज कामाला लागली आहे. तर तिकडे ज्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे त्या उमेदवारांची धाकधूक नक्कीच वाढली आहे. आज जवळपास पावणे नऊ कोटी मतदार सव्वा तीन हजार उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद करणार आहेत.दरम्यान प्रशासनाकडून निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे.

राज्यातील एकूण मतदार :

  • महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार.
  • महाराष्ट्रात एकूण ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत.
  • यामध्ये पुरुष मतदार – ४ कोटी ६८ लाख ७५हजार, ७५०
  • महिला मतदार- ४ कोटी २८ लाख ४३ हजार ६३५
  • तृतीयपंथी मतदार- २ हजार ६३४ आहेत.
  • दिव्यांग मतदार – ३ लाख ९६ हजार आहेत
  • सर्व्हिस मतदार- १ लाख १७ हजार ५८१ आहेत

मतदान केंद्रे 

  • विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे आहेत.मुख्य मतदान केंद्र – ९५,४७३
  • सहायक मतदान केंद्र – १,१८८
  • ‘सखी मतदार केंद्रे’ – ३५२
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सावधान! स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंगच

News Desk

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरवर २ ठिकाणी अपघात

swarit

‘फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप’ हा आत्मनिर्भर भारतातील महत्त्वाचा उपक्रम! – मुख्यमंत्री

Aprna