HW News Marathi
महाराष्ट्र

कोकणात जाण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ई पासवरून राणे बंधूंचा सरकारवर प्रहार

मुंबई | कोरोना काळात सण उत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे आणि यापुढे काही काळ तसाच साजरा केला जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने गणेश चतुर्थीला कोकणात जाणाऱ्या जनतेसाठी गाड्यांची सोय केली नसल्याचे सांगत भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. “प्रशासन ठप्प, पालकमंत्री गायब… याला म्हणतात ठाकरे सरकार”, अशा शब्दात नितेश राणे यांनी ठाकरे सरकावर प्रहार केला आहे.

तर भाजप नेते निलेश राणे यांनी देखील याच विषयावरून ठाकरे सरकारला सुनावले आहे. “कोकणात जाण्यासाठी लोकांना खूप त्रास होतोय. राज्य सरकारने ई-pass चे नाटक बंद करावं, काही गरज नाही पासची. दलालांना पोसण्यासाठी पास ठेवलाय काय? क्वाॅरंटाईन किती दिवसाचा असेल हे पण सरकारने अजून सांगितले नाही. कोकणी माणूस मागच्या ४ महिन्यांपासून जे भोगतोय ते कधी विसरणार नाही”, अशा खोचक शब्दांत त्यांनी टीका केली आहे. त्यामुळे राणे बंधूंनी ठाकरे सरकारवर केलेल्या या प्रहाराला काय उत्तर येणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील जनतेने आज सरकारच्या मुस्काटात लगावली – राम कदम 

News Desk

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार

Aprna

‘कोरोनाचे नियम पाळत ग्रामसभा घेण्यास परवानगी द्या’, शिवसेना खासदाराची राज्य सरकारकडे मागणी!

News Desk