HW News Marathi
महाराष्ट्र

यंदा शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला रामदास कदमांना ‘नो एंट्री’? कथित ऑडिओ क्लिपमुळे वाढल्या अडचणी

शिवसैनिकांसाठी ‘दसरा’ मेळावा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा उत्सव. मात्र, यंदाही हा मेळावा शिवतीर्थावर होणार नसून मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये फक्त ५०% उपस्थितीत होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या मेळाव्याला फक्त शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते, मंत्री तसेच नगरसेवक, महापौर, आमदार आणि उपनेते उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता शिवसेनेच्या या वरिष्ठ नेत्याच्या नावाची मोठी चर्चा सुरु आहे. ते म्हणजे माजी मंत्री रामदास कदम. यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला रामदास कदम उपस्थित राहणार की नाही? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहे.

काहीच दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेत मोठा वाद रंगला आहे. या प्रकरणामुळे, मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचंड संतापल्याचं म्हटलं जात आहे. उद्धव ठाकरेंच्या रागामुळे रामदास कदमांवर पक्षांतर्गत कारवाई होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. कथित ऑडिओ क्लिपची शहानिशा करून रामदास कदम यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असं सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. असं असलं तरी उद्धव ठाकरेंच्या रामदास कदमांवरील नाराजीबाबत चर्चा होत असताना दसरा मेळाव्याला त्यांना आमंत्रण नसावं अशी देखील चर्चा रंगत आहे.

कथित ऑडिओ क्लिपमुळे वाढल्या अडचणी

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. मात्र, त्यासाठी एका शिवसेनेच्याच नेत्यानंच सोमय्यांना माहिती पुरवल्याचा आरोप होत आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांच्या काही कथित ऑडिओ क्लिपही समोर आल्या. ज्यात किरीट सोमय्या, रामदास कदम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा संवाद असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, रामदास कदम यांनी जरी आपल्यावरचे हे सर्व आरोप फेटाळून लावले असले तरीही पक्षांतर्गत या कथित ऑडिओ क्लिपची शहानिशा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

कोरोनाचं संकट जरासे ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. मात्र, तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल? याचं नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशीच इच्छा आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी आरक्षण दिलं आणि कोर्टातही टिकवलं मात्र राज्य सरकारला ते टिकवता आलं नाही –  शिवेंद्रराजे भोसले  

News Desk

नौका उलटली; पण मोबाइलने तारले

News Desk

“केसेस कशा रद्द करायच्या हे अजितदादांकडून शिकावं”, नारायण राणेंची पवारांवर टीका!

News Desk