HW News Marathi
Covid-19

कोणीही पायी चालत जाणे, उपवास करणे असे काहीही प्रयत्न करू नका, धनंजय मुंडेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई | राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णलयात उपचार सुरू आहे. धनंजय मुंडे यांचे राज्यभरातील समर्थक ते बरे होण्यासाठी प्रार्थना, नवस उपवास, पायी भगवान गडावर जात आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी फेसबुकद्वारे आवाहन की, “आपण सर्वांनी आहात त्या ठिकाणी राहून स्वतःचे आणि कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करावे. एकमेकांची काळजी घ्यावी. हेच माझ्यासाठी सदिच्छा आणि प्रार्थनांचे काम करतील.”

धनंजय मुंडे यांचा ११ जून रोजी रात्री कोरोना चाचाणी अहवाल पॉझिटिव्ह आला. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात धनंजय मुंडे त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे.

 

धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट

मी लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून माझ्यावर प्रेम करणाऱ्या आपल्यातील काही जणांकडून विविध प्रकारे प्रार्थना केल्या जात आहेत, काहीजण उपवास करत आहेत, काहीजण नवस-पायी वाऱ्या करत आहेत, कोणी मुंबईकडे येण्याचा प्रयत्न करीत आहेत; तुम्हा सर्वांचे माझ्यावरील ऋण वाढतच जात आहेत!

पण सहकाऱ्यांनो, असे काहीही करू नका. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा-आशीर्वादाने मी ठणठणीत बरा होऊन येणार आहे. कोणीही पायी चालत जाणे, उपवास करणे असे काहीही यत्न करू नका. माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही त्रास झालेला मला कसा बरा वाटेल? आपण सर्वांनी आहेत त्या ठिकाणी राहून स्वतःचे व कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करावे, एकमेकांची काळजी घ्यावी, हेच माझ्यासाठी सदिच्छा व प्रार्थनांचं काम करतील.

Please take care, we will win this war

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजन थाळीवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहा !

News Desk

नव्या वर्षाचं नागरिकांना गिफ्ट,  WHOकडून  फायझरच्या लसीला मान्यता

News Desk

देशात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ

News Desk