HW News Marathi
महाराष्ट्र

जुन्या मैत्रिणी आमने-सामने, रुपाली चाकणकर-चित्रा वाघ वाद पुन्हा पेटला!

मुंबई | राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांत चांगलंच तापलं आहे. सचिन वाझे प्रकरण, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे आरोप यामुळं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात अनिल देशमुख यांनी नैतिकतेचं कारण देत गृहमंत्री पदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यामुळं हा वाद आणखीच चिघळला आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेंकावर टीका करत आहेत. विशेषतः भाजप विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आमने-सामने आहेत. असाच कलगीतुरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यातही रंगला आहे.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना शुभेच्छा देताना, एक ट्विट केलं. त्यात महाराष्ट्रात महिला मुलींवर होणार्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी कठोर पावले उचलतं घटनांची तात्काळ दखल घ्याल, अशा अपेक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केल्या आहेत.

चित्रा वाघ यांच्या या पोस्टवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. राजकीय उदरनिर्वाहासाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या काही लोकांना नवीन वसुलीमंत्री कोण याची काळजी लागली होती. एकीकडे मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत म्हणायचं आणि दुसरीकडे असं अशोभनीय वक्तव्य करायचा दुटप्पीपणा कसा जमत असेल? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला. कर्तव्यनिष्ठ ही दिलीपराव वळसे पाटीलसाहेबांची ओळख आहे. कारवाई होऊ नये म्हणून पक्ष बदलणाऱ्या लाचखोरांनी जरी त्यांना आज शुभेच्छा दिल्या असल्या तरी ते अशा गुन्हेगारांना सोडणार नाहीत, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांनी वळसे पाटलांना शुभेच्छा दिल्यानंतर रुपाली चाकणकरांना एवढा राग का आला यामागंही कारण आहे. चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये आता नवा वसुली मंत्री कोण असणार असा? सवाल करत राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली होती.

रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्या, त्या ट्विटलाही फेसबूक पोस्टद्वारे उत्तर दिलं होतं. चित्रा ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण?? अहो ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!! असं रुपाली चाकणकर यांनी त्यांना म्हटलं होतं.

चित्रा वाघ यांच्या टीकेला उत्तर देताना रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आधी टीका केली आणि नंतर पतीवर कारवाई होऊ नये म्हणून शुभेच्छांची पोस्ट केल्याचं रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पोस्टमधून अप्रत्यक्षरित्या म्हटलं आहे. आता भविष्यात हा वाद आणखी किती वाढत जाणार हे समोर येईलच. पण पक्षाची बाजू मांडण्यासाठी एकेकाळी एकत्र काम केलेले कार्यकर्तेही एकमेकांवर आक्रमकपणे हल्ला प्रतिहल्ला करत असल्याचं आता पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. आंबेडकराचे परळमधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित

News Desk

“सरकारच्या गुंड आणि झुंडशाहीला आम्ही घाबरणार नाही”, फडणवीसांचा ‘मविआ’ला इशारा

Aprna

मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरुन संजय निरुपम यांची हकालपट्टी ?

News Desk