HW News Marathi
महाराष्ट्र

नामांतरणाच्या मुद्यावरून दादर स्थानकाबाहेर भीम आर्मीचे आंदोलन

मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने देशभरातील अनुयायी त्यांना अभिवानदन करण्यासाठी आज (६ डिसेंबर) मुंबईतील चैत्यभूमीवर येतात. या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी येतात. भीम आर्मीने दादर स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी दादर स्थानकावर आणि ब्रीजवर घोषणाबाजी केल्याचे चित्र दिसले.

गेल्या अनेक वर्षापासून दादर रेल्वे स्थानकांचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामांतर करावे, अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने केली जात आहे. पुन्हा एकदा भीम आर्मी महापरिनिर्वाण दिनी रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याची मागणी करत दादर रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन केले आहे. दादर स्थानकाबाहेर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी ‘जय भीम, जय भीम’ असा नारा दिला. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी हातात दादार स्थानकाच्या नामांतरणाचे पोस्टर्स घेऊन घोषणाबाजी केली.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra Budget 2021-22 : महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून महिलांसाठी खास भेट

News Desk

“संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, आणि सामना देखील वाचत नाही”

News Desk

अधिकार्‍यांना हाताशी धरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न फडणवीस हे करत आहेत – नवाब मलिक

News Desk