HW News Marathi
महाराष्ट्र

एकबोटे कुटुंबियांना एनकाउंटर करण्याची धमकी

पुणे | ‘एकबोटे फॅमिलीला तोफेच्या तोंडी द्या व एनकाऊंटर करा,’ अशा आशयाचे धमकीचे पत्र मिलिंद एकबोटे कुटुंबीयांना अज्ञातांकडून आले आहे. त्यामुळे एकबोटे कुटूंबीयांच्या वतीने पोलिस संरक्षण मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.

नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांनी शिवाजी नगर पोलिसांत याबाबतची तक्रार करून पोलिसांना ते धमकीचे पत्रही दिले आहे. एकबोटे कुटुंबीयांना तोफेच्या तोंडी देऊन त्यांचा एन्काउंटर करा, अशा आशयाचे हे पत्र असल्याचं नंदकिशोर एकबोटे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद करून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

‘मिलिंद एकबोटे यांचा कोरेगाव-भीमा प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. 1 जानेवारी 2018 रोजी ते घरातच होते. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास त्यातून हे स्पष्टच होईल. तसेच पुणे पोलिसांनी एकबोटे यांना पोलिस संरक्षण दिले होते.

या पोलिसांकडून माहिती घेतल्यास एकबोटे घरीच असल्याचं सिद्ध होईल,’ असा दावाही या तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान एकबोटे दोषी असल्याने त्याला अटक करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापुर्वीच स्पष्ट केले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर उद्धव ठाकरेही बेईमान झाले नसते”, शिवसेना नेत्याचं फडणवीसांना प्रत्युत्तर

News Desk

हरीण चाललं पंढरपूरला, विठूरायाच्या दर्शनाला

News Desk

शरद पवारांवरील शस्त्रक्रिया पुर्ण, प्रकृती स्थिर

News Desk