HW News Marathi
महाराष्ट्र

आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री !

मुंबई | राज्यातील अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर अखेर महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, शिवसेना पक्षमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आता बराच कालावधी उलटून गेला असला तरीही अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. एकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागून राहिलेले असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या एका आमदाराच्या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. “आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री आहेत,” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केले आहे. अण्णा बनसोडे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जेव्हा पक्षाशी बंडखोरी करत भाजपला साथ देत २३ नोव्हेंबर रोजी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा त्यांच्यासोबत पक्षाचे जे काही आमदार होते त्यांपैकी एक अण्णा बनसोडे हे देखील होते. त्यातले काही आमदार त्या शपथविधीनंतर पक्षाकडे पुन्हा परतून आले. मात्र, अण्णा बनसोडे हे शेवटपर्यंत अजित पवार यांच्यासोबतच राहिले. त्यानंतर, अजित पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांच्या समर्थकांकडून आता त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची मागणी होते आहे.

अण्णा बनसोडेंनी तर थेट आपल्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे. बहुचर्चित अशा सिंचन घोटाळ्यातून पूर्णपणे क्लीनचिट मिळाल्यानंतर आता पक्षाकडून अजित पवारांना कोणते पद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अगदी उद्या (२४ डिसेंबर) देखील राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. मात्र, पक्षाशी बंडखोरी केल्याबद्दल अजित पवारांवर कारवाई कधी होणार ? किंवा आता नक्की ही कारवाई होणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होतो. पक्षाकडून अजित पवारांबाबत नेमका कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्व मंत्र्यांना त्यांच्या आवडीची वाहने खरेदी करता येणार !

News Desk

डिझेल परताव्याचे १२ कोटी वितरित करण्यास वित्त विभागाची मान्यता! – अस्लम शेख

Aprna

राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या !

News Desk