HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडें आता जाणार मध्यप्रदेशात, विधानसभा, लोकसभेचा करणार प्रचार

दिल्ली। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशचे प्रभारी करण्यात आले आहे. राष्ट्रीय सचिव झाल्यानंतर पंकजांकडे पहिल्यांदाच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.यावेळी पंकजा म्हणाल्या, निवडणुका लढण्यात भाजपचा हातखंडा आहे. मी मध्यप्रदेशची प्रभारी आहे. मी परवा मध्यप्रदेशात जाणार आहे. खंडवात निवडणूक सुरू आहे. तीन विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक सुरू आहे. मी त्याचा प्रचार करणार आहे. प्रत्येक नेत्याला आपले विभाग दिले आहेत. निवडणुकीची जोरात तयारी सुरू आहे. प्रत्येकजण काम करत आहे. आमचा संकल्प हा अंत्योदयाचा आहे. राजकीय पावलं उचलतो तसं सामाजिक पावलंही उचलणार आहोत. त्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली, असे पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात संताप

महाराष्ट्रातील ओबीसीला आरक्षण मिळालं होतं. ते पन्नास टक्क्याच्यावर गेलं होतं. हे आरक्षण रद्द होण्याची शंका असताना सर्वच्या सर्व आरक्षण रद्द झालं. त्यामुळे ओबीसींमध्ये संताप आहे. त्यावर आम्ही राजकीय आणि सामाजिक भूमिकेतून बोललो आहे. मराठा आरक्षणही रद्द झालं आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात संताप आहे. इतर राज्यांनीही त्यांच्या पातळीवर आरक्षणाबाबत भूमिका घेतली आहे. घटनेत देशाचे आणि राज्याचे अधिकार क्लिअर आहेत. त्याप्रमाणे बदलत्या काळाप्रमाणे काही निर्णय घेतले पाहिजे. घटनेत काही अमेंडमेंट करण्याची गरज आहे. विधानसभेच्या लेव्हलवर काही बदल करता येतात ते केले पाहिजे, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

राजकीय पावलांसोबत आम्ही सामाजिक पावलंही उचलणार

मध्यप्रदेशमध्ये येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपा सज्ज आहे. मला पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी परवा मध्यप्रदेशात जाणार आहे. खंडवात तीन विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक सुरू आहे. या ठिकाणी भाजपाच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहे. प्रत्येक नेत्याला विभाग दिले असून सर्वांकडूनच ताकद पणाला लावण्यात येत आहे. आमचा संकल्प हा अंत्योदयाचा आहे. राजकीय पावलांसोबत आम्ही सामाजिक पावलंही उचलणार आहोत. यासंदर्भात काल बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मुंडे यांनी दिली.

मी सहकाराची अभ्यासक नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील नेत्यांसह केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करणार आहेत. सहकाराच्या मुद्द्यावर ही बैठक होणार आहे. त्याबाबतची कल्पना नसल्याचं पंकजा यांनी स्पष्ट केलं. मला मिटींगची कल्पना नाही. मी त्याच्यात नाही. पण हरकत नाही. सहकाराच्या मुद्द्यावर सहकार्य करायला कोणी तरी तयार असेल तर चांगलीच गोष्ट आहे, असं त्या म्हणाल्या. अमित शहा हे सहकार मंत्री झाल्यापासून त्यांच्याशी भेट झाली नाही. मी सहकाराची अभ्यासक नाही. फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांनी अभ्यास करूनच प्रपोजल आणलं असले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राने GSTचे थकीत २८ हजार कोटी तातडीने द्यावे – रोहित पवार

News Desk

“पडळकर हा एक मनोरुग्ण,” शिवसेनेचा पडळकरांवर थेट वार  

News Desk

…..या चार अटींवर भुजबळांना जामीन मंजूर

News Desk