HW News Marathi
महाराष्ट्र

मी निवडणूक जिंकल्यानंतर कधीच त्याचा देखावा करत नाही | पंकजा मुंडे

बीड | मी निवडणूक जिंकल्यानंतर कधीच त्याचा देखावा करत नाही आणि पराभव झाल्यावर ही मी तो स्वीकारते. आता मराठवाड्यामध्ये आमची फार मोठी ताकद उभी राहिली असल्याचे ग्रामविकास मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे आम्हाला नक्कीच फायद झाला आहे. लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे सुरेश धस ७६ मतांनी विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे. सुरेश धस यांना ५२७ मते, अशोक जगदाळे यांना ४५१ मते मिळाली. तर तब्बल २५ मते बाद झाली.

तसेच मी मुंडे साहेबांचे राजकार जवळून पाहिले आहे. त्यातून मी एकच शिकले की, जोपर्यंत निकाल बाहेर येत नाही, तोपर्यंत कार्यकर्त्याने आपले जिंकण्याचे प्रयत्न थांबवायचे नाहीत. राजकारणात खेळी करता येत नसेल तर राजकारण सोडून द्यावे. परंतु जनतेशी कधीच खेळी करू नये, असे पंकजा मुंडे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

या विजयानंतर बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारपरिषद घेऊन जनतेचे आभार मानले. भाजपाचे सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर आणि निवडणूक भाजप शिवसेनेने युतीने लढविली म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचेही त्यांनी आभार मानले.

 

Related posts

‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपालांकडून नुकतेच सन्मानित झालेले राजेंद्र सरग यांचे निधन

News Desk

संपामुळे महाराष्ट्रातमध्ये कोट्यवधींचे नुकसान

Adil

ठाकरे सरकारची नियतच खोटी, भाजपकडून वीज बिलाच्या रद्दीवरुन सरकारवर टीका 

News Desk