HW News Marathi
महाराष्ट्र

मी निवडणूक जिंकल्यानंतर कधीच त्याचा देखावा करत नाही | पंकजा मुंडे

बीड | मी निवडणूक जिंकल्यानंतर कधीच त्याचा देखावा करत नाही आणि पराभव झाल्यावर ही मी तो स्वीकारते. आता मराठवाड्यामध्ये आमची फार मोठी ताकद उभी राहिली असल्याचे ग्रामविकास मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे आम्हाला नक्कीच फायद झाला आहे. लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे सुरेश धस ७६ मतांनी विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे. सुरेश धस यांना ५२७ मते, अशोक जगदाळे यांना ४५१ मते मिळाली. तर तब्बल २५ मते बाद झाली.

तसेच मी मुंडे साहेबांचे राजकार जवळून पाहिले आहे. त्यातून मी एकच शिकले की, जोपर्यंत निकाल बाहेर येत नाही, तोपर्यंत कार्यकर्त्याने आपले जिंकण्याचे प्रयत्न थांबवायचे नाहीत. राजकारणात खेळी करता येत नसेल तर राजकारण सोडून द्यावे. परंतु जनतेशी कधीच खेळी करू नये, असे पंकजा मुंडे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

या विजयानंतर बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारपरिषद घेऊन जनतेचे आभार मानले. भाजपाचे सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर आणि निवडणूक भाजप शिवसेनेने युतीने लढविली म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचेही त्यांनी आभार मानले.

 

Related posts

बर्ड फ्ल्यू हा आजार गंभीर, आरोग्य विभागाने अलर्ट घोषीत करणं गरजेचं – राजेश टोपे

News Desk

बॉम्बे आयआयटीने तयार केले ‘SAFE ॲप ‘

swarit

महाजाॅब्सवरून शिवसेनेने काँग्रेसकडे व्यक्त केली दिलगिरी !

News Desk
महाराष्ट्र

भय्युजी महाराजांनी लिहिलेली सुसाईट नोट सापडली

News Desk

इंदौर | प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी इंग्रजीत सुसाईट नोट लिहून ठेवली होती. ‘मला आयुष्यातील ताण असह्य झाला असून मी खूप थकलोय. माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असे भय्युजी महाराजांनी सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे.

भय्युजी महाराज यांनी आत्महत्येपुर्वी सुसाईट नोट लिहिली आहे. महाराजांनी आत्महत्या करण्याच्या वेळीस त्यांची पत्नी आणि आई घरात उपस्थित होत्या. तसेच त्यांचे अनुयायी देखील घरात असून गोळीचा आवाज ऐकू आल्यानंतर भय्युजी महाराजांच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली.

परंतु महाराजांचा खोलीचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे दरवाजा तोडून त्यांच्या खोलीत अनुयायी दाखल झाल्यानंतर पाहिले की, महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यानंतर भय्युजी महाराजांना इंदौर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Related posts

पार्थ पवार यांची ‘सत्यमेव जयते’कडे वाटचाल सुरू, चंद्रकांत पाटील यांचे मोठे वक्तव्य

News Desk

ED कडून खडसेंनी तब्बल 9 तास चौकशी ! बाहेर पडल्यावर काय दिली प्रतिक्रिया ?

News Desk

दहीहंडीसाठी मुख्यमंत्र्यांना फोनवर विनवणी, परवानगी न दिल्यास आशिष शेलारांचा आंदोलनाचा पवित्रा!

News Desk