HW News Marathi
देश / विदेश

“वाह रे मोदी तेरा खेल”; इंधन दरवाढीविरोधात युवा काँग्रेस आक्रमक

बीड । बीड जिल्ह्याच्या परळी येथे केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवा काँग्रेस आक्रमक झाल्याचं चित्र समोर पाहायला मिळत आहे. जवळपास २ वर्ष कोरोनामुळे सर्वसामान्य लोक असंख्य आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. मात्र, अशावेळी दिलासा देण्याऐवजी धक्केच मिळत आहे. पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या असून त्यामुळे केंद्र सरकारविरोधात जनतेमध्ये रोष वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर, बीड जिल्ह्यात आज (२० ऑक्टोबर) राष्ट्रवादी युवा काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे.
“सबका साथ सबका विकास” म्हणणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बीड जिल्ह्यात महागाई, पेट्रोल डिझेल, घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ तसेच केंद्र सरकारच्या विरोधात परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर या ठिकाणी तीव्र निदर्शनं करण्यात येत आहेत. केंद्र सरकरचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी ही निदर्शनं करण्यात येत आहेत”, असंही यावेळी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांनी म्हटलं आहे.

“वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू मेहंगा तेल”

“मोदी सरकार चले जाव” ,”वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू मेहंगा तेल”, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. ही निदर्शने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, युवक प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब इ. नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहेत.

दरवाढ थांबविण्यासाठी पाठपुरावा करावा!

जनभावनांचा आदर करून शासनाने दरवाढ थांबविण्यासाठी पाठपुरावा करावा अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. याच, मागणीकरिता राज्यभर राष्ट्रवादी युवा काँग्रेस आक्रमक झाली असून आंदोलन करीत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणासाठी केंद्राच्या गाईडलाईन्स जारी

News Desk

घरेलू कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक ,महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची शिष्टमंडळाला ग्वाही

News Desk

मल्ल्याची प्रत्यार्पणविरोधी याचिका इंग्लंडच्या न्यायालयाने फेटाळली

News Desk