HW News Marathi
Covid-19

प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार – राजेश टोपे

मुंबई | राज्यात कोरोनाच्या संकटाला आळा घालण्यासाठी अनेक स्तरांवर आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाचे रुग्ण कसे बरे होतील, कोणती उपचार पद्धती अवलंबली की ते लवकर बरे होतील याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. त्यामूळे महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार आहे. जे रुग्ण बरे झालेत त्यांचे रक्तद्राव घेऊन ते कोरोनाच्या गंभीर रुग्णांना दिले जाणार. यामूळे बाधितांच्या शरीरात ॲण्टीबॉडीज वाढण्यास मदत होणार आहे. या प्रयोग लवकर सुरु करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (२२ एप्रिल) लाईव्हच्या माध्यमातून दिली.

दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या एका व्यक्तीच्या रक्तातून किमान ८०० मिलीलीटर प्लाझ्मा घेतला जाऊ शकतो. तर कोरोनाबाधित व्यक्तीच्या शरीरात ॲण्टीबॉडीज टाकण्यासाठी २०० मिलीलीटर प्लाझ्मा दिल्या जाऊ शकतात. त्यामूळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या प्लाझ्मातून ३-४ रुग्ण बरे होऊ शकतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता पाणी डोक्यावरून गेलं, आजच ऑक्सिजन पुरवा”, उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं!

News Desk

मुंबईत ११०० नवे रुग्ण आढळले , तर ५३ जणांचा झाला मृत्यू 

News Desk

फडणवीस साहेब, थोडे शांत बसा आणि सरकारचे काम बघत रहा !

News Desk