HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा, या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता वनमंत्रीपदासाठी लॉबिंग केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच बंजारा समाजाच्या एका नेत्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मलाच आता वनमंत्री करा, अशी मागणी केली आहे.

बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वनमंत्री करण्याची मागणी केली आहे. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्याऐवजी मला मंत्री करा, असे हरिभाऊ राठोड यांनी पत्रात म्हटले आहे.

आता वनमंत्रीपद मला द्यावे. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते, असेही राठोड यांनी पत्रात नमूद केले आहे. या पत्रानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतरच महाविकास आघाडीत वनमंत्रिपद मिळवण्यासाठी चाचपणी सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील, त्याच मंत्र्याकडे जाईल, असे सांगितले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कधी करणार?; प्रवीण दरेकर यांचा सवाल

News Desk

जर मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना मिळाले तर आम्हाला आनंद होईल !

News Desk

राज्य सरकारची घोषणा!; ST कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्क्याने वाढ

News Desk